SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा

SBI, RBI - SBI खातेधारकांसाठी मोठी खुशखबर. बँकेनं RBIचा निर्णय अमलात आणलाय

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : SBI खातेधारकांसाठी मोठी खुशखबर. आता तुम्हाला बँकेत पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर चार्जेस पडणार नाहीत. बँकेनं RBIचा निर्णय अमलात आणलाय. आता RTGS आणि NEFT चार्जेस काढून टाकलेत. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं सामान्यांसाठी मोठी घोषणा केली होती. SBI नं हा निर्णय 1 जुलै 2019 पासून अमलात आणलाय. या निर्णयानंतर इंटरनेट बँकिंग स्वस्त होतेय. आता RBI नं बँकांना हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवायला सांगितलंय. आता SBIमधून RTGS आणि NEFT करणं स्वस्त झालंय.

RTGS आणि NEFT म्हणजे काय?

आरबीआयनं  RTGS आणि NEFT वर बँकाकडून आकारण्यात येणारे दर रद्द केलेत. RBI बँकांकडून हे दर घेत होती, पण आता ते घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फक्त बँक जे दर आकारेल तेच द्यावे लागतील.  म्हणजे RTGS आणि NEFT स्वस्त होतील.

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय आणि वर्षाला कमवा लाखो रुपये

RTGS (Real-time gross settlement) हे लाखो रुपये ट्रान्सफर करायचं उत्तम माध्यम आहे. या माध्यमात काही सेकंदात पैसे ट्रान्सफर होतात. याउलट एनईएफटी (National electronic funds transfer ) ठराविक वेळीच पैसे ट्रान्सफर होतात.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकांच्या 78 जागांवर भरती, असा करा अर्ज

लॉस एंजल्सला शक्तिशाली भूकंपाचा धक्का; रस्त्यांना पडल्या भेगा!

याशिवाय आता सेंट्रल बँक आॅफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी कर्जावर कमी ईएमआयची खास भेट दिलीय. बँकेनं एमसीएलआर कमी केलंय. तुम्ही गृहकर्ज, आॅटो आणि पर्सनल लोन घ्यायचा विचार करत असाल तर एक खुशखबर आहे. तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल तर तुमचा फायदा नक्की होईल. बँकेनं MCLR मध्ये वाढ केल्यानं त्याचा परिणाम ग्राहकांवर पडतोय. एप्रिल 2016नंतर ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना फायदा आहे. एप्रिल 2016च्या आधी रिझर्व्ह बँकेद्वारा कर्ज देण्यासाठी कमीत कमी रेट बेस रेट होता. म्हणजे बँक याहून कमी दरावर ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हती. 1 एप्रिल 2016पासून बँकिंग सिस्टिममध्ये MCLR लागू झाला. म्हणजे आता MCLRच्या आधारे कर्ज दिलं जाईल.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

First published: July 6, 2019, 1:05 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading