मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI कडून मिळेल विना गॅरंटी 20 लाखांपर्यंत लोन, तुम्ही पात्र आहात का? लगेच चेक करा

SBI कडून मिळेल विना गॅरंटी 20 लाखांपर्यंत लोन, तुम्ही पात्र आहात का? लगेच चेक करा

SBI चे ग्राहक गरजेनुसार बँकेच्या कस्टमाईज्ड पर्सनल लोन प्रोडक्टचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (टर्म लोन) त्वरित उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना किमान कागदपत्रे देणे आवश्यक आहे.

मुंबई, 13 जानेवारी : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना (State Bank of India Customer) विविध सुविधा पुरवल्या जातात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे पगार खाते (Salary Account) उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेतून पगार खाते उघडणाऱ्या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक पगार खाती असलेल्या ग्राहकांना गृह कर्ज (Home Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan), कार कर्ज (Car Loan) आणि वैयक्तिक कर्जावर (Personal Loan) सूट देते. याशिवाय अनेक प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात.

20 लाखांपर्यंत कर्ज मिळेल

ग्राहक गरजेनुसार बँकेच्या कस्टमाईज्ड पर्सनल लोन प्रोडक्टचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (टर्म लोन) त्वरित उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना किमान कागदपत्रे देणे आवश्यक आहे. पगारदार ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या या वैयक्तिक कर्जाला कोणत्याही सुरक्षा किंवा हमीची आवश्यकता नाही.

LIC ची महिलांसाठी खास योजना; रोज 29 रुपये गुंतवून मिळतील 4 लाख रुपये

कर्जाचा लाभ कोणाला मिळतो

>> कस्टमाईज्ड वैयक्तिक कर्जासाठी, ग्राहकाचे कोणत्याही शाखेत पगार खाते असणे आवश्यक आहे.

>> किमान निव्वळ मासिक वेतन (minimum net salary) 15,000 रुपये असावे.

>> कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्र, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांची कर्मचारी असावी.

>> कर्ज अर्जदाराचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असावे.

Go Airlines IPO: कोरोनाचा फटका; गो एअरलाईन्सकडून 3600 कोटींच्या IPO ला स्थगिती

व्याजदर काय आहेत?

या कर्जाचा व्याजदर 9.60 टक्क्यांपासून सुरू होऊन 11.10 टक्के प्रतिवर्ष असेल. यामध्ये ग्राहकांना कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध

बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेत ग्राहकांना 2 महिन्यांचा पगार आगाऊ मिळतो.

First published:

Tags: Loan, SBI