मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ITR filing : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता इन्कम टॅक्स रिटर्न भरा मोफत, वाचा प्रोसेस

ITR filing : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता इन्कम टॅक्स रिटर्न भरा मोफत, वाचा प्रोसेस

SBI ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआय ग्राहक आता विनामूल्य प्राप्तिकर परतावा (आयटीआर) मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. SBI चे ग्राहक आता बँकेच्या YONO अॅपवर Tax2Win द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआय ग्राहक आता विनामूल्य प्राप्तिकर परतावा (आयटीआर) मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. SBI चे ग्राहक आता बँकेच्या YONO अॅपवर Tax2Win द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं अलीकडेच सांगितलं की, ग्राहक आता YONO अॅपवर प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतात. एसबीआयनं एका ट्विटमध्ये म्हटलंय की, 'तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करायचे आहे का? तुम्ही हे YONO वर Tax2Win द्वारे विनामूल्य करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 5 कागदपत्रांची आवश्यकता असेल. फक्त आमचं YONO अ‌ॅप डाउनलोड करा.' एसबीआय ग्राहकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल- 1. पॅन कार्ड 2. आधार कार्ड 3. फॉर्म -16 4. कर कपातीचा तपशील 5. व्याज उत्पन्नाचं प्रमाणपत्र 6. कर बचतीसाठी गुंतवणुकीचे पुरावे हे वाचा - Weather Alert: बंगालच्या उपसागरात नवं संकट; शेतीची कामं उरण्यासाठी शेतकऱ्यांकडे अवघा एक आठवडा बाकी जाणून घ्या ITR कसा भरायचा - ग्राहकांना प्रथम एसबीआय YONO अॅपवर लॉगिन करावं लागेल. - मग “Shops and Orders” चा पर्याय निवडावा लागेल. - यानंतर ग्राहकाला “कर आणि गुंतवणूक” (Tax and Investment) चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावं लागेल. - येथे ग्राहकाला “Tax2Win” पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर ग्राहक ITR भरू शकतो. हे वाचा - फक्त तुम्हीच नाही तर Google ही करतेय तुमच्या अकाउंटची सुरक्षा, यासाठी फक्त करा एवढं काम तर 5000 दंड होईल सरकारनं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या तारखेनंतर रिटर्न भरल्यास 5,000 रुपये दंड होऊ शकतो. मात्र, करदात्याचं उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आत असेल, तर विलंब दंड म्हणून 1,000 रुपये भरण्याचा नियम आहे.
First published:

Tags: Income tax, SBI

पुढील बातम्या