SBI मध्ये 8,653 नोकऱ्या उपलब्ध, जाणून घ्या कसा भरायचा अर्ज

SBI मध्ये 8,653 नोकऱ्या उपलब्ध, जाणून घ्या कसा भरायचा अर्ज

स्टेट बँक आॅफ इंडियानं क्लार्क पदासाठी जागा भरण्याची घोषणा केलीय. SBIनं देशातल्या सर्व ब्रँचमध्ये रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन पाठवलंय.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : स्टेट बँक आॅफ इंडियानं क्लार्क पदासाठी जागा भरण्याची घोषणा केलीय. SBIनं देशातल्या सर्व ब्रँचमध्ये रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन पाठवलंय. देशातल्या कुठल्याही भागातून या पदांसाठी अर्ज करता येईल. क्लार्क पदाच्या 8,653 जागा भरायच्या आहेत. SBI क्लार्क 2019च्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आज (12 एप्रिल 2019) पासून सुरू होतेय. इच्छुक आणि योग्य उमेदवार 3 मे 2019 पर्यंत आॅनलाइन अर्ज करू शकतात.

SBI clerk notification: महत्त्वाच्या तारखा

ही अधिसूचना घोषित झाली : 11 एप्रिल 2019

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 मे 2019

प्राथमिक परीक्षेसाठी काॅल लेटर : जून 2019

प्राथमिक परीक्षा : जून 2019

मुख्य परीक्षेसाठी काॅल लेटर कधी? : जुलै 2019

मुख्य परीक्षा : 10 आॅगस्ट 2019

पदांची संख्या

जनरल- 3674

EWS- 853

OBC- 1966

ST- 799

SC- 1361

एकूण पदांची संख्या - 8653

बॅकलॉग

OBC- 6

ST- 219

SC- 26

कुल- 251

दोन्ही मिळून पदांची संख्या - 8904

वयाची अट ( 1.04.2019 )

20 ते 28 वर्षांचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयाच्या अटीतून सूट

SC/ST- 5 वर्ष

OBC- 3 वर्ष

PWD(Gen/ EWS)- 10 वर्ष

PWD (SC/ST)- 15 वर्ष

PWD (OBC)- 13 वर्ष

जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी : 1.1.1980 ते 31.12. 1989च्या मध्ये - 5 वर्ष

अर्जाचं शुल्क आणि इंटिमेट चार्ज

1. SC/ST/PWD/XS: 125/- (इंटिमेशन चार्ज फक्त)

2. जनरल/OBC/EWS: 750/- ( अर्ज शुल्क, यात इंटिमेट चार्जही आहे )

ही गोष्ट लक्षात असू दे की या चार्जेसचा रिफंड मिळणार नाही.

योग्यता

शैक्षणिक योग्यता : भारत सरकार मान्य कुठल्याही संस्थेतून कुठल्याही शाखेतून पदवी हवी किंवा समांतर शैक्षणिक अर्हता हवी. उमेदवाराकडे IDD सर्टिफिकेट असेल तर ते 31.08.2019च्या आधीचं असावं.

SBI Clerk Recruitment: असा करा आॅनलाइन अर्ज

उमेदवार SBI पदांवर आॅनलाइन अर्ज करू शकतात. दुसरा कुठला पर्याय नाही.

उमेदवाराला आॅनलाइन अर्जासाठी स्वत: रजिस्टर करावं लागेल.

त्यासाठी SBI च्या वेबसाइटवर रजिस्टर करा - https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers

रजिस्टर केल्यानंतर उमेदवाराला अर्जाची फी भरावी लागेल. तुम्ही आॅनलाइनवरून डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यावरून पैसे भरू शकता.


VIDEO : जनतेला विकास हवाय, माझा विजय निश्चित : सुजय विखे-पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 12:28 PM IST

ताज्या बातम्या