2 मार्चपासून येणारे SBI IPO कार्ड्स ठरणार फायद्याचे, भरपूर फायदा देणारे हे कार्ड नेमकं आहे तरी काय?

2 मार्चपासून येणारे SBI IPO कार्ड्स ठरणार फायद्याचे, भरपूर फायदा देणारे हे कार्ड नेमकं आहे तरी काय?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपली कार्ड कंपनी एसबीआय कार्ड्सच्या आयपीओला मंजूरी मिळाली आहे. या IPOमुळे 40 टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय कार्ड्सचा आयपीओ (SBI Cards IPO) मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. या आयपीओमुळे SBIमधील गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) आणणाऱ्या एसबीआय कार्ड्स एंड पेमेंट्स सर्व्हिसेसचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 200 ते 250 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. थोडक्यात आयपीओचा प्राइस बँड प्रति शेअर 690 रुपयांवरून प्रति शेअर 710 रुपये राहील अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे लिस्टिंगमध्ये या प्रत्येक शेअरमागे 250 रुपयांचा फायदा होऊ शकतो. सरकारी कंपनी IRCTC ला सुद्धा ग्रे मार्केटमध्ये एवढाच प्रीमियम मिळत आहे. आयपीओ आल्यानंतर IRCTC च्या शेअर्समधून 100 टक्क्यांहून जास्त परतावा मिळाला आहे.

SBI कार्ड्सबाबत अधिक माहिती

-SBI कार्ड्सचा आयपीओ मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. एसबीआय कार्ड देशातील सर्वात मोठा आणि 18 टक्के मार्केट शेअर असणारे क्रेड कार्ड जारी करणार आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी डिसेंबर 2019मध्ये याबाबत माहिती दिली होती.

-याची किंमत 690 ते 710 प्रति शेअर दरम्यान असू शकते. त्यामुळे कंपनीला 69 हजार 500 कोटी ते 72 हजार कोटी रुपयांचा मार्केट कॅप मिळेल.

(हेही वाचा-CORONAVIRUS मुळे खिशाला चाप, मोबाईल, टीव्ही, फ्रिज आणि एसी महागणार)

- SBI कार्ड्सचा आयपीओची जबाबदारी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, SBI कॅपिटल मार्केट्स, DSP Merrill Lynch, अॅक्सिस कॅपिटल, HSBC सिक्युरिटीज आणि कॅपिटल मार्केट्स नोमुरा फायनान्शिअल अडव्हायजरी (Nomura Financial Advisory) आणि सिक्युरिटीजकडे देण्यात आली आहे.

-कार्ड्समध्ये SBI ची 74 टक्के आणि कार्लाइल ग्रुपची 26 टक्के भागीदारी आहे. या ऑफरमुळे SBIला 2 हजार 780 कोटी ते 2 हजार 880 कोटी रुपये कमावण्यात मदत होईल.

First published: February 20, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या