आता कार्ड किंवा पैसे न देता करा शॉपिंग, SBI ची ही खास सेवा

आता कार्ड किंवा पैसे न देता करा शॉपिंग, SBI ची ही खास सेवा

तुम्ही दुकानात गेलात आणि तुम्हाला अचानक तुमचं ATM कार्ड घरी ठेवल्याचं आठवलं तर? तुमच्याकडे पुरेशी कॅशही नसेल तर आणखीनच पंचाईत होते. पण आता काळजीचं कारण नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : तुम्ही दुकानात गेलात आणि तुम्हाला अचानक तुमचं ATM कार्ड घरी ठेवल्याचं आठवलं तर? तुमच्याकडे पुरेशी कॅशही नसेल तर आणखीनच पंचाईत होते. पण आता काळजीचं कारण नाही. SBI (State Bank of India)ने ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे.

SBI च्या या सेवेचं नाव आहे, SBI Card Pay. यामध्ये पॉइंट ऑफ सेल्स मशीन्सवर कार्ड न वापरता मोबाइल फोनच्या माध्यमातून बिल देता येतं. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा ग्राहक त्यांच्या मोबाइलवर एक टॅप करून घेऊ शकतात.

कसा कराल याचा वापर?

SBI Card Pay चा वापर करायचा असेल तर कार्डधारकांना त्यांचं कार्ड SBI कार्ड मोबाइल अॅप वर रजिस्टर करावं लागेल.हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ग्राहकांना पेमेंट करणं सोपं जाईल. फोन अनलॉक करून तुमचा मोबाइल पॉइंट ऑफ सेल टर्मिनलच्या जवळ आणला की पेमेंट होऊ शकेल.

(हेही वाचा : कमी धोका पत्करून पैसे दुप्पट करण्यासाठी उरले काही तास, मोदी सरकारची योजना)

अँड्रॉइड फोनमध्ये वापर

SBI कार्ड ने ही सुविधा VISA प्लॅटफॉर्मवर लाँच केलीय. ही कोणत्याही अँड्राइड फोनवरही वापरता येते.

SBI कार्ड पे वापरणाऱ्या ग्राहकांना काही सवलतही मिळते. त्याचवेळी रोज ट्रॅन्झॅक्शन लिमिट ठरवण्याचीही सूट मिळते. सध्या HCI च्या अॅप ग्राहकांना 2 हजार रुपये प्रति व्यवहार आणि प्रतिदिन 10 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी आहे.

=======================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 20, 2019, 4:48 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading