मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुलाला द्या नव्या वर्षाचं गिफ्ट, SBI देतंय कार लोनवर सूट

मुलाला द्या नव्या वर्षाचं गिफ्ट, SBI देतंय कार लोनवर सूट

 SBI ने खास कार लोनच्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत.

SBI ने खास कार लोनच्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत.

SBI ने खास कार लोनच्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. काहीवेळा कार एकरकमी पैशांमध्ये घेणं परवड नाही. त्यात आपल्याकडे नवीन वर्षही एका उत्साहासारखं साजरं केलं जातं. जर तुम्ही नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. SBI ने खास कार लोनच्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत.

याशिवाय 1 जानेवारीपासून कारच्या किंमती वाढणार आहेत. SBI ग्राहकांसाठी नव्या वर्षाची खास भेट दिली आहे. ग्राहकांना यामध्ये स्वस्त व्याजदरासह ही कार घेता येणार आहे. यासाठी ग्राहक ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कार खरेदी करू शकता.

प्रीपेमेंटवर कोणतीही पेनल्टी द्यावी लागणार नाही. याशिवाय ग्राहकांना ९० टक्क्यांपर्यंत कार घेण्यासाठी कर्ज मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर SBI ची ही ऑफर तुम्ही एकदा बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन चेक करू शकता.

सावधान! तुमच्या Pan Card चा गैरवापर तर होत नाही?

काय आहे वैशिष्ट्यं?

सर्वात कमी व्याज दर आणि ईएमआय

७ वर्षांपर्यंत लोन फेडता येणार सर्वात जास्त मुदत दिली जाते

ऑन रोड किंमतीसाठी बँक अर्थसहाय्य करणार

ऑन-रोड किंमतीमध्ये नोंदणी आणि विमा समाविष्ट आहे.

डेली रिड्युसिंग बॅलन्सवर मोजलं जाणारं व्याज;

नवीन प्रवासी कार, मल्टी युटिलिटी व्हेईकल (एमयूव्ही) आणि एसयूव्हीच्या खरेदीसाठी.

'ऑन-रोड प्राइस'च्या ९०% पर्यंत लोन मिळणार

आगाऊ ईएमआय भरता येणार नाही

वैकल्पिक एसबीआय लाइफ इन्शुरन्स कव्हर उपलब्ध

प्रोसेसिंग फी आणि व्याजदरासाठी तुम्ही बँकेच्या साईटवर भेट देऊ शकता

नवीन वर्षापूर्वी आनंदाची बातमी! या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ, पाहा नवीन दर

कार लोनमध्ये फ्लेक्सी पे पर्याय

बँकेकडे आपल्या ग्राहकांसाठी अनन्य फ्लेक्सी पे पर्याय आहे.

फ्लेक्सी पे पर्याय अंतर्गत, कर्जदार खालील 2 पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकतात

पहिल्या 6 महिन्यांचा ईएमआय लागू असलेल्या नियमित ईएमआयच्या 50% असेल, कर्जाचा कालावधी कमीतकमी 36 महिने असेल.

पहिल्या 6 महिन्यांचा ईएमआय नियमित ईएमआय लागू होण्याच्या 50% असेल आणि पुढील 6 महिने नियमित ईएमआयच्या 75% लागू असेल, परंतु कर्जाची मुदत किमान 60 महिने असेल.

अधिक माहितीसाठी / संपर्क केंद्राद्वारे अर्ज करण्यासाठी 1800-11-2211 डायल करा

आमच्या संपर्क केंद्रातून परत कॉल मिळविण्यासाठी 7208933145 7208933142 वर मिस्ड कॉल किंवा "कार" असा एसएमएस करा

First published:

Tags: Car, Credit card, Money, SBI