1 मार्चपासून बदलणार बँक आणि ATM चे हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 मार्चपासून बदलणार बँक आणि ATM चे हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

येत्या मार्च महिन्यापासून बँकेच्या काही गोष्टी बदलणार आहेत. तुमचं SBI मध्ये खातं असेल तर जास्त परिणाम होऊ शकतो. मार्च 2020 मध्ये 5 मोठ्या गोष्टी बदलणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : येत्या मार्च महिन्यापासून बँकेच्या काही गोष्टी बदलणार आहेत. तुमचं SBI मध्ये खातं असेल तर जास्त परिणाम होऊ शकतो. मार्च 2020 मध्ये 5 मोठ्या गोष्टी बदलणार आहेत.

1 मार्चपासून ब्लॉक होऊ शकतं बँक खातं

SBI ग्राहकांसाठी KYC गरजेचं आहे. हे भरलं नसेल तर तुमचं बँक खातं बंदही होऊ शकतं. रिझर्व्ह बँकेनेच KYC करणं गरजेचं केलं आहे.

2. ATM मधून 2 हजार रुपयांची नोट नाही

सरकारी बँक असलेल्या इंडियन बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, ज्या ग्राहकांना 2 हजार रुपयांची नोट हवी असेल ते बँकेत जाऊ कॅश घेऊ शकतात पण इंडियन बँकेच्या ATM मधून 2 हजार रुपयांची नोट काढता येणार नाही.

3. GST चा नवा नियम होणार लागू

लॉटरीवर एक मार्चपासून 28 टक्क्यांच्या दराने GST लागेल.

(हेही वाचा : Zomato-Swiggy च्या ऑनलाइन फूडवर सरकारची असेल नजर, नियम झाले कडक)

4. SBI च्या ATM कार्डमधून पैसे काढण्याचे नियम बदलले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India)ने ATM कार्डशी जोडलेले नियम जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, कार्डलेस व्यवहार यासाठी ग्राहकांना आपल्या कार्डवर सेटिंग करावं लागेल. हा नवा नियम 16 मार्चपासून बदलणार आहे.

5. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती

देशातल्या मोठ्या तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती जारी करतात. पण यावेळी ऑइल मार्केटिंग कंपनी इंडेनने स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती 12 फेब्रुवारीलाच वाढवल्या होत्या.

सगळ्या महानगरांमध्ये विनाअनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 149 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली.

=========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATM
First Published: Feb 26, 2020 07:48 PM IST

ताज्या बातम्या