Elec-widget

SBI च्या ग्राहकांना इशारा, ही खबरदारी घेतली नाहीत तर रिकामं होईल बँक खातं

SBI च्या ग्राहकांना इशारा, ही खबरदारी घेतली नाहीत तर रिकामं होईल बँक खातं

तुमचं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या इंटरनेटवरून बँक खात्यातल्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : तुमचं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या इंटरनेटवरून बँक खात्यातल्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका आहे. यासाठीच SBI ने त्यांच्या वेबसाइटवर याबद्दलची माहिती दिली आहे.

'फिशिंग' ही एका प्रकारची इंटरनेट चोरी आहे. या माध्यमातून खातं क्रमांक, नेट बँकिंग पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, व्यक्तिगत माहिती चोरली जाते. या माहितीच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढता येतात किंवा क्रेडिट कार्डातून बिलं भरली जातात.

'फिशिंग'हल्ल्यापासून असं वाचू शकता

'फिशिंग' हल्ल्यात युजरला एक फसवा ई मेल येतो. तो त्याच्या अधिकृत इंटरनेट पत्त्यावर पाठवला जातो. यामध्ये असलेल्या हायपर लिंक वर क्लिक करा, असं त्यात लिहिलेलं असतं.

जेव्हा युजर हायपरलिंकवर क्लिक करतो तेव्हा एक नकली वेबसाइट उघडते. ती इंटरनेट बँकिंग वेबसाइटसारखीच असते.ही प्रक्रिया पूर्ण केली तर बक्षीस मिळेल आणि नाही केली तर दंड लागेल, असा इशारा दिलेला असतो. युजरला गोपनीय माहिती द्यायला सांगितलं जातं. जर सबमिट बटन क्लिक केलं तर तुम्ही या फिशिंगच्या तावडीत सापडता.

Loading...

(हेही वाचा : बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अनेक देश अशांत,IMF च्या रिपोर्टमुळे चिंता वाढली)

हे करू नका

कोणत्याही परिस्थितीत अशा अनोळखी पत्त्यावरून आलेला ई मेल आणि त्या लिंकवर क्लिक करू नका. यामध्ये एक कोड असू शकतो. पॉप विंडोच्या रूपात येणाऱ्या कोणत्याही पेजवर माहिती देऊ नका. तुमचा पासवर्ड फोनवर किंवा ई मेल वर शेअर करू नका.पासवर्ड, पिन, टिन ही सगळी माहिती गोपनीय आहे आणि बँक कर्मचाऱ्यांनाही ती माहीत नसते. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही याबद्दल विचारणं अपेक्षित नाही.

काय करता येऊ शकतं ?

- कधीही योग्य URL टाइप करून साइटवर लॉगऑन करा.

- प्रमाणित लॉगइन पेज वरच तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड एंटर करा.

- युजर आयडी आणि पासवर्ड टाइप करण्याआधी लॉगइन पेजचं URL 'https://'text ने सुरू होतं की नाही ते पाहा.

=================================================================================================

काळजाचा ठोका चुकवणारी रेड्याची झुंज, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Oct 15, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...