मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI Alert! ATM मधून पैसे काढणं महागणार, चेकबुकसाठीही बदलणार नियम; जाणून घ्या डिटेल्स

SBI Alert! ATM मधून पैसे काढणं महागणार, चेकबुकसाठीही बदलणार नियम; जाणून घ्या डिटेल्स

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापासून ते चेकबुकपर्यंत आणि अन्य अर्थिक व्यवहारांसाठी कसे असतील नवे नियम जाणून घ्या.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापासून ते चेकबुकपर्यंत आणि अन्य अर्थिक व्यवहारांसाठी कसे असतील नवे नियम जाणून घ्या.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापासून ते चेकबुकपर्यंत आणि अन्य अर्थिक व्यवहारांसाठी कसे असतील नवे नियम जाणून घ्या.

नवी दिल्ली, 8 जून : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असणारी स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) एटीएम आणि बॅंक शाखेतून पैसे काढण्यासंदर्भातील नियम आणि शुल्कामध्ये पुढील महिन्यापासून बदल करणार आहे. बेसिक सेव्हिंग्ज बॅंक डिपॉझिट खातेधारकांना (BSBD) हे नवीन शुल्क लागू असेल. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापासून ते चेकबुकपर्यंत आणि अन्य अर्थिक व्यवहारांसाठी कसे असतील नवे नियम जाणून घ्या.

एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे काय?

एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बॅंक डिपॉझिट अकाउंट म्हणजे समाजातील गरीब घटकांवर कोणत्याही शुल्काचा भार न टाकता त्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता दिलेली सुविधा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक झिरो बॅलन्स अकाउंट (Zero Balance Account) असून, बीएसबीडी खाते धारकांना किमान शिल्लक किंवा कमाल शिल्लक रकमेचं कोणतंही बंधन नाही. बँक बीएसबीडी खाते धारकांना बेसिक रुपे एटीएम-डेबिट कार्ड देते. वैध KYC कागदपत्र असलेली कोणतीही व्यक्ती बीएसबीडी अकाउंट सुरू करु शकते.

एसबीआय एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे नियम -

बीएसबीडी खातेधारकास दर महिन्याला एटीएम आणि बँक शाखेतून चार वेळा विनामूल्य रोख रक्कम काढता येईल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपये जीएसटी शुल्कासह शुल्क लागू होईल. होम ब्रँच आणि एटीएम तसंच एसबीआय व्यतरिक्त अन्य बॅंकांच्या एटीएममधून रोख रक्कम काढल्यास त्यास शुल्क लागू होईल.

(वाचा - APY Scheme: दररोज 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला होईल 5 हजारांची सेव्हिंग)

चेक बुकसाठी शुल्क -

एका आर्थिक वर्षात बीएसबीडी खातेधारकास बॅंक 10 पानी चेकबुक (Cheque Book) देईल. त्यानंतर चेकबुक करता एसबीआय शुल्क आकारणार आहे.

- 10 पानी चेकबुकसाठी बॅंकेकडून 40 रुपये आणि जीएसटी असं शुल्क आकारण्यात येईल.

- 25 पानी चेकबुकसाठी बॅंकेकडून 75 रुपये आणि जीएसटी असं शुल्क घेतलं जाईल.

- 10 पानी आपत्कालीन चेकबुकसाठी बॅंक 50 रुपये आणि जीएसटी असं शुल्क आकारणार आहे.

परंतु, नवीन चेकबुक शुल्कातून ज्येष्ठ नागरिकांना वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

BSBD खातेधारकांसाठी मुख्य किंवा अन्य शाखेतून नॉन फायनेंशिअल ट्रान्झेक्शन (Non Financial Transaction) करण्याकरता शुल्कवाढ केलेली नाही. बीएसबीडी खातेधारकांसाठी शाखा आणि वैकल्पिक चॅनेलद्वारे केलेलं हस्तांतरण व्यवहार विनामूल्य असतील, असं बॅंकेच्या सूत्रांनी सांगितलं.

(वाचा - महिन्याला 4500 रुपये गुंतवणूक करुन मिळवता येतील 1 कोटी, वाचा या योजनेबाबत)

बँकेने ग्राहकांना अन्य शाखांमधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. या साथीच्या कालावधीत ग्राहकांना पाठबळ मिळावं, यासाठी अन्य शाखांमधून चेकद्वारे किंवा फॉर्म भरुन पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असल्याची माहिती बँकेने ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान, स्टेट बँकेने नुकतीच चेकद्वारे रोख रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. बचत बॅंक पासबुकधारकांसाठी फॉर्म भरुन रोख रक्कम काढण्याची मर्यादा प्रतिदिन 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय थर्ड पार्टी रोख रक्कम काढण्याची मर्यादा प्रतिमहिना 50,000 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. पैसे काढण्याच्या स्वरुपात थर्ड पार्टीला (Third Party) रोख रक्कम दिली जाणार नाही, असं बॅंकेने स्पष्ट केलं आहे. सुधारित मर्यादा 30 सप्टेंबरपर्यंत वैध असेल.

First published:

Tags: SBI, Sbi alert, Sbi ATM, SBI Bank News