Home /News /money /

सावधान ! चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट; SBIचा इशारा

सावधान ! चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट; SBIचा इशारा

sbi

sbi

सध्या सायबर क्राईमचं (Cyber Crime)प्रमाण वाढलं असून, एखाद्या बनावट मेसेजमुळं तुमच्या खात्यातील सगळी रक्कम लंपास केली जाऊ शकते.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank Of India) ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय सावधगिरीनं करावा आणि कोणत्याही प्रकारच्या बनावट संदेशांना बळी पडू नये असं आवाहन केलं आहे. सध्या सायबर क्राईमचं (Cyber Crime)प्रमाण वाढलं असून, एखाद्या बनावट मेसेजमुळं तुमच्या खात्यातील सगळी रक्कम लंपास केली जाऊ शकते. त्यामुळं ग्राहकांनी सावध राहावं असं बँकेनं म्हटलं आहे. सध्या गुन्हेगार व्यक्ती सोशल मीडियावर (Social Media)भुरळ पडणारे बनावट मेसेज पाठवत आहेत. बँक अशाप्रकारचे कोणतेही मेसेज पाठवत नाही, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर सावधानता : स्टेट बँकेनं एक ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगा. कोणत्याही बनावट, भ्रामक संदेशाला बळी पडू नका, अन्यथा तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. अशी जाणून घ्या खात्यातील रक्कम : स्टेट बँकेतील खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घ्यायची असेल तर आपल्या रजिस्टर मोबाईलवरून टोल फ्री क्रमांक 92237 66666 वर मिस्ड कॉल द्या किंवा मेसेजद्वारे शिल्लक जाणून घ्यायची असेल तर 0922 3766666 वर ‘BAL’ असा एसएमएस पाठवा. तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे कळवली जाईल. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर केलेला असणं आवश्यक आहे. अखेर महाराष्ट्रापर्यंत पोहोचला नवा कोरोना; ब्रिटनमधून आलेल्या 8 जणांमध्ये लक्षणं कोणालाही वैयक्तिक माहिती देऊ नका : आपली वैयक्तिक माहिती जसं की एटीएम पिन, कार्ड नंबर, ओटीपी कोणालाही सांगू नका. बँक वेळोवेळी देते सूचना : देशातील ही सर्वांत मोठी बँक दररोज आपल्या लाखो करोडो ग्राहकांसाठी सावधगिरीच्या सूचना (अॅलर्ट) देत असते. ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणं हा बँकेचा उद्देश्य आहे. यासाठी बँक ट्विटर हँडल आणि एसएमएसच्या सहाय्यानं ग्राहकांना सावध करत असते. भारतीय रेल्वे देतेय कमाईची संधी; हे व्यवसाय सुरू करुन करा मोठी कमाई  एक जानेवारीपासून नवीन सेवा : स्टेट बँकेनं एक जानेवारी 2021 पासून चेक पेमेंट साठी नवी सुविधा लागू केली आहे. यानुसार 50 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असतील तर आवश्यक माहितीची दोनवेळा खात्री करून घेणं आवश्यक आहे. एक जानेवारीपासून बँकेनं पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली आहे.
    First published:

    Tags: SBI

    पुढील बातम्या