नवी दिल्ली, 11 मार्च : स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. सर्व बचत खातेधारकांना सरासरी मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यामुळे आता बँकेच्या सर्व बचत खातेधारकांना झिरो बॅलन्स खात्याची सेवा मिळणार आहे. याशिवाय बँकेच्या सर्व बचत खात्यांच्या व्याजदरसुद्धा वार्षिक तीन टक्के केले आहेत.
एसबीआयने बुधवारी एक परिपत्रक काढलं असून यात एसबीआयच्या 44.51 कोटी बचत खातेधारकांसाठी सरासरी मंथली मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केली. सध्या मेट्रो शहरांत बचत खात्यामध्ये किमान रक्कम 3 हजार रुपये, निमशहरांमध्ये 2 हजार रुपये तर ग्रामीण भागात 1 हजार रुपये असणं आवश्यक आहे.
मिनिमम बॅलन्स खात्यावर नसेल तर खातेधारकाला 5 रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो. एसबीआयने केलेल्या घोषणेमुळे आता सर्व खाते धारकांना झिरो बॅलन्सची सेवा मिळणार आहे. यामुळे खात्यावर रक्कम असायलाच हवी असं काही नाही. याशिवाय बँकेनं एसएमएस सेवेसाठी घेतलं जाणार शुल्कही घेणार नसल्याचं सांगितलं आहे.
हे वाचा : SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका! FD वर मिळणार आता ‘इतकं’ कमी व्याज
बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितलं की, बँकेनं घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा असेल. सर्वात आधी ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत हे पाऊल उचललं आहे. याशिवाय बँकेनं बचत खात्यांवर वार्षिक व्याज दरही समान केले आहेत. सर्व श्रेणींसाठी वार्षिक व्याजदर 3 टक्के केले आहेत.
हे वाचा :
आता तुमच्या बॅंक चेकमध्ये होणार मोठा बदल, RBI आणणार नवीन सिस्टम मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.