SBI ने दिला महत्त्वाचा इशारा! 31 मे पूर्वी 'हे' काम करा अन्यथा बँक खातं होईल बंद

SBI ने दिला महत्त्वाचा इशारा! 31 मे पूर्वी 'हे' काम करा अन्यथा बँक खातं होईल बंद

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक (Largest PSU Bank) असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of India-SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मे: देशातील (India) सर्वात मोठी सार्वजनिक बँक (Largest PSU Bank) असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of India-SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे. 31 मे पर्यंत बँकेच्या सर्व ग्राहकांनी आपले केवायसी (KYC-Know Your Customer) अपडेट करावे असं बँकेने एका अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे. स्टेट बँकेचे देशभरात तब्बल 44 कोटी ग्राहक आहेत. 31 मेपर्यंत केवायसी अपडेट न केल्यास आपल्या खात्याची सेवा बंद होऊ शकेल असं बँकेनं ग्राहकांना कळवले आहे. त्यामुळे कोणताही त्रास न होता आपल्या खात्याची बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी तातडीनं हे काम करावं असं आवाहन बँकेनं केलं आहे.

केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर, अर्थात कोणत्याही बँकेत आपलं खातं उघडलं की खातेदाराला त्याचा मोबाइल नंबर, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड, पत्ता, ईमेल आदी माहिती द्यावी लागते. यात काही बदल झाल्यास त्या बाबतही बँकेला वेळोवेळी कळवणे आवश्यक असते.

ट्वीट करुन जारी केल्या सूचना

भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ट्विटर हँडलवर (Twitter Handle) याबाबतची अधिसूचना (Notification) जारी केली आहे. ग्राहकांनी त्यांची केवायसीसाठीची कागदपत्रे त्यांच्या खातं असलेल्या शाखेत किंवा जवळच्या शाखेत सादर करावीत. देशातील कोरोना परिस्थितीमुळे बँकेनं यासाठीची मुदत 31मे पर्यंत वाढविली आहे. या मुदतीत केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची खाती गोठविली जातील,असं बँकेनं म्हटलं आहे.

KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Corona Pandemic) देशात ठिकठीकाणी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना घराबाहेर पडून आपल्या बँक शाखेत येणं अडचणीचं ठरू शकतं हे लक्षात घेऊन, बँकेनं ग्राहकांना त्यांची कागदपत्रे पोस्ट किंवा ईमेलद्वारे बँकेत पाठवून केवायसी अपडेट करण्याची परवानगी दिली आहे.ज्या खात्यांचे KYC अपडेट झालेलं नाही अशी खाती 31 मेपर्यंत गोठवू नयेत, अशी स्पष्ट सूचना बँकेनं आपल्या सर्व कर्मचार्‍यांना दिली आहे.

31मे नंतर खातं गोठवले जाईल :

आतापर्यंत केवायसी अपडेट नसेल तर लगेच खातेदाराचे खातं गोठवण्यात (Freeze) येत होतं, आता ही प्रक्रिया 31 मेपर्यंत केली जाणार नाही, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे.

First published: May 2, 2021, 8:51 PM IST

ताज्या बातम्या