कोट्यवधी ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास रिकामे होईल तुमचे बँक खाते

कोट्यवधी ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास रिकामे होईल तुमचे बँक खाते

देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यांच्या ग्राहकांना या फ्रॉडपासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना अलर्ट पाठवणारे काही ट्वीट एसबीआय (SBI) कडून शेअर केले जातात.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) वाढले आहेत. मात्र त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रमाण देखील वाढले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यांच्या ग्राहकांना या फ्रॉडपासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना अलर्ट पाठवणारे काही ट्वीट एसबीआय (SBI) कडून शेअर केले जातात. नुकतेच एसबीआयने या फ्रॉडपासून वाचण्यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

या ट्वीटमध्ये एसबीआयने फिशिंगबाबत सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक माहिती इंटरनेटवर शेअर करताना सावधानता बाळगण्याबाबत भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी काही सोपे मार्क अवलंबण्याचे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. एसबीआयने ग्राहकांना या सूचना लक्षात याव्यात याकरता एक व्हिडीओ या ट्वीटमधून शेअर केला आहे.

(हे वाचा-पैशासंबंधित ही कामं करण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख,पूर्ण ने केल्यास होईल नुकसान)

फिशिंग म्हणजे काय?

फिशिंग एकप्रकारे ऑनलाइन फसवणूक असते, ज्यामध्ये तुमची बँकिंग किंवा इतर आर्थिक माहिती जसे की, बँक खाते क्रमांक, बँकिंग पासवर्ड, वैयक्तिक ओळखपत्र इ. गोष्टी सऱ्हाइतपणे चोरी केल्या जातात. याकरता फोन कॉल किंवा इंटरनेटचा वापर केला जातो. त्यानंतर हॅकरकडून खात्यातील रक्कम काढली जाते किंवा एखाद्या वेगळ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते.

फिशिंगपासून कसे वाचाल?

-नेहमी अॅड्रेस बारमध्ये योग्य यूआरएल टाकूनच साइटवर लॉग इन करा

-केवळ प्रमाण वेबसाइटवरच तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा

(हे वाचा-कोरोनाचा फटका! करिअर ऑप्शन म्हणून पाहिलं जाणाऱ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचं संकट)

-तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकताना आधी तपासून पाहा की तुम्ही उघडलेल्या साइटची लिंक 'https:// या अक्षरांनी सुरू होत आहे, 'http:// या अक्षरांनी नाही. यातील S चे तात्पर्य सुरक्षेचा संकेत आहे. वेबपेज इनक्रिप्टेड आहे की नाही, हे यावरून समजते.

-फोनवरून एखाद्याला बँकिंग आणि इतर आर्थिक माहिती देताना सावधानता बाळगा. कारण कोणत्याही बँकेतून तुमचा पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती विचारण्यासाठी फोन केला जात नाही. योग्य खात्री करुनच गरजेची माहिती समोरच्याला द्या.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 30, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या