SBI ग्राहक असाल तर ही चूक टाळा, या अलर्टकडे दुर्लक्ष केल्यास खातं रिकामं होण्याची भीती

SBI ग्राहक असाल तर ही चूक टाळा, या अलर्टकडे दुर्लक्ष केल्यास खातं रिकामं होण्याची भीती

आजकाल लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकारच्या ऑनलाइन बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) पद्धतींचा वापर केला जातो. अशावेळी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI ने वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना सावधान केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 डिसेंबर: देशामध्ये दररोज नवनवीन फसवणुकीची प्रकरणं समोर येत आहेत. ऑनलाइन फसवणूक आणि बँकिंग फ्रॉडचे प्रकारही वाढले आहेत. या प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवत असते. यामध्ये बँकेने नुकतेच एक ट्वीट जारी केले आहे आणि त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे.

आजकाल बँकांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी ग्राहक गुगलचा वापर करतात. किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनवरून बँकांसंबधी सर्च करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सर्वच माहिती गुगलवर उपलब्ध होत नाही. अशावेळी योग्य माहिती मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाणे केव्हाही चांगले. SBI ने ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, ग्राहकांना बँकेच्या संबंधित सेवेविषयी माहिती मिळवताना हेल्पलाइन क्रमांक किंवा वेबसाइटचा वापर केला पाहिजे.

अनेकदा ग्राहक गुगल सर्च केल्यानंतर बनावट वेबसाइटवर देखील व्हिजीट करतात. ज्यामुळे फसवणूक होण्याचा सर्वाधिक धोका आहे. एसबीआय संबंधित माहिती मिळवण्यासाठी नेहमी https://bank.sbi याच वेबसाइटवर जा

टोल फ्री क्रमांकावर करा फोन

एसबीआयने त्यांच्या ग्राहकांसाठी काही टोल फ्री क्रमांकही जारी केले आहेत. कोणत्याही माहितीसाठी तुम्ही कस्टमर केअर क्रमांक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 यावर संपर्क करू शकता.

फेक मेल्सबाबत सावधान

ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या फेक मेल्सबाबतही एसबीआयने वेळोवेळी त्यांना सावध केले आहे. या मेल्सशी SBI चा काही संबंध नाही आहे. असे मेल्स उघडण्यापासूनही ग्राहकांनी सावध राहणे आवश्यक आहे. अशा भ्रामक आणि बनावट मेल्स किंवा मेसेजेसच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला बँकेने वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना दिला आहे. त्याचप्रमाणे एसबीआय च्या नावाने ग्राहकांना फोन कॉल्स केले जातात. त्याच्याकडून CVV, Pin number, ATM PIN, पासवर्ड या गोष्टींची विचारणा केली जाते. लक्षात घ्या बँकेचे अधिकारी अशाप्रकारे कोणतीही माहिती विचारत नाहीत. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास तुमचे बँक खाते रिकामे होण्याची भीती आहे.

First published: December 8, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading