Home /News /money /

SBI Alert : एसबीआयची सुविधा आज रात्री 7 तास राहणार बंद, आपली कामे आधीच करुन घ्या

SBI Alert : एसबीआयची सुविधा आज रात्री 7 तास राहणार बंद, आपली कामे आधीच करुन घ्या

बँकेने म्हटले आहे की कम्प्लेंट सेवा पोर्टल (Complaint Service Portal) 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी काही तासांसाठी उपलब्ध नसेल. एसबीआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे डिजिटल व्यवहार करायचे असतील तर ते लवकर पूर्ण करा.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 फेब्रुवारी : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI (State Bank Of India) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी आपले पोर्टल अपडेट करत असते. यामध्ये बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने म्हटले आहे की कम्प्लेंट सेवा पोर्टल (Complaint Service Portal) 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी काही तासांसाठी उपलब्ध नसेल. एसबीआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे डिजिटल व्यवहार करायचे असतील तर ते लवकर पूर्ण करा. एसबीआयने अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ग्राहकांना कळवले आहे की, ग्राहकांना आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो कारण आम्ही अधिक चांगला बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. LIC IPO : एलआयसीचे शेअर स्वस्तात हवेत? 28 फेब्रुवारी आधी 'हे' काम करा बँकेने म्हटले आहे की, बँकेच्या http://crcf.sbi.co.in या तक्रार पोर्टलची सेवा 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाही. बँकेच्या म्हणण्यानुसार, या काळात ग्राहक कोणत्याही प्रकारची तक्रार, चौकशी इत्यादींसाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800112211/18001234/18002100 वर संपर्क साधू शकतात. PNB Payment Rules: पीएनबी ग्राहकांसाठी एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम, चेक करा डिटेल्स SBI ही देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या वेबसाइटनुसार, ही एक चतुर्थांश मार्केट शेअर असलेली देशातील सर्वात मोठी बँक आहे. आपल्या 11 उपकंपन्यांद्वारे SBI जनरल इन्शुरन्स, SBI लाइफ इन्शुरन्स, SBI म्युच्युअल फंड, SBI कार्ड इत्यादीसारख्या विविध व्यवसायांमध्ये यशस्वीरित्या विविधता आणली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Sbi alert, SBI bank

    पुढील बातम्या