SBI Alert! मोबाइल नंबर आणि Email Id रजिस्टर केलात का? या 3 गोष्टींची मिळेल अचूक माहिती

SBI Alert! मोबाइल नंबर आणि Email Id रजिस्टर केलात का? या 3 गोष्टींची मिळेल अचूक माहिती

देशातली सगळ्यात मोठी बँक असेलल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिला आहे. कोणत्याही ग्राहकाचा मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलला असेल तर लगेचच त्यांना बँकेत अपडेट करायचा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जानेवारी : देशातली सगळ्यात मोठी बँक असेलल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिला आहे. कोणत्याही ग्राहकाचा मोबाइल नंबर किंवा ई मेल आयडी बदलला असेल तर लगेचच त्यांना बँकेत अपडेट करायचा आहे. हे झालं नाही तर तुम्हाला काही महत्त्वाच्या अपडेट्स मिळू शकणार नाहीत. आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई मेल बदलण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. SBI ने आपल्या ग्राहकांना हा नंबर बदलण्याचा ऑनलाइन पर्याय दिला आहे. तुम्ही काही मिनिटांत हे काम कसं करू शकता हे बघुया.

या आहेत 8 स्टेप्स

स्टेप 1: यासाठी पहिल्यांदा तुम्ही SBI च्या वेबसाइटवर www.onlinesbi.com लॉगइन करा

स्टेप 2 : यानंतर डाव्या बाजूच्या वरचा सेक्शन My Accounts and Profile वर जा आणि तिथे ड्रॉप डाउन करा.

स्टेप 3: आता profile वर क्लिक करा. यानंतर Personal details/Mobile वर क्लिक करा.

स्टेप 4 : आता profile password टाका आणि Submit बटनावर क्लिक करा.

(हेही वाचा : या बँकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी, हे आहे कारण)

स्टेप 5: इथे 'Change Mobile Number-Domestic only (Through OTP/ATM/Contact Centre)वर क्लिक करा.

स्टेप 6: 'Personal Details-Mobile Number Update' यासह एक नवी स्क्रीन येईल.

स्टेप 7 : इथे तुमचा नवा मोबाइल नंबर टाइप करा. नंतर रिटाइप करा.

स्टेप 8 : त्यानंतर 'Verify and confirm your mobile number xxxxxxxxxx' हा पॉप मेसेज येईल. मग पुढे जाण्यासाठी 'OK' क्लिक करा.

(हेही वाचा : ATM मधून पैसे आलेच नाहीत पण खात्यातून गेले तर काय कराल?)

स्टेप 9 : आता जी नवी स्क्रीन तुमच्यासमोर उघडेल त्यात मोबाइल नंबर अॅप्रूव्हलसाठी 3 वेगवेगळे मोड दिसतील.

स्टेप 10 : या मोडमध्ये एक असेल OTP on both the Mobile Number आणि दुसरा असेल IRATA : Internet Banking Request Approval through ATM आणि तिसरा असेल Approval through Contact Centre

=========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Jan 8, 2020 04:28 PM IST

ताज्या बातम्या