SBI ग्राहकांसाठी ALERT! आज या वेळेत वापरता येणार नाहीत महत्त्वाच्या Banking सेवा

SBI ग्राहकांसाठी ALERT! आज या वेळेत वापरता येणार नाहीत महत्त्वाच्या Banking सेवा

सध्याच्या काळात बँकेची ऑनलाइन सेवा काही कालावधीसाठी बंद असली, तरी मोठी अडचण होऊ शकते. म्हणूनच SBI ने मेन्टेनन्ससाठी आपली ऑनलाइन सेवा (Online Services) काही काळासाठी बंद ठेवणार असल्याची माहिती पुरेसा वेळ ठेवून जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे:  गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंट (Digital Payment), ऑनलाइन बँकिंग (Online Banking), यूपीआय पेमेंट (UPI Payment) या गोष्टी सर्व स्तरांतल्या नागरिकांच्या अगदी नेहमीच्या वापरातल्या झाल्या आहेत. नोटबंदीनंतर ऑनलाइन बँकिंगला चालना मिळाली आणि गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यापासूनही त्यात पुन्हा वाढ झाली. म्हणूनच जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या बँकेची ऑनलाइन सेवा काही कालावधीसाठी बंद असली, तरी मोठी अडचण होऊ शकते. म्हणूनच स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) मेन्टेनन्ससाठी आपली ऑनलाइन सेवा (Online Services) काही काळासाठी बंद ठेवणार असल्याची माहिती पुरेसा वेळ ठेवून जाहीर केली आहे. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'न याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

आज, सात मे रोजी रात्री 10.15 ते आठ मे रोजी मध्यरात्री 1.45 अशा साडेतीन तासांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाइन सेवा पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत आयएनबी, योनो, योनो लाइट, यूपीआय सर्व्हिसेस (INB, YONO, YONO lite, UPI) अशा सर्व प्रकारच्या सेवा बंद राहणार आहेत. ऑनलाइन बँकिंग यंत्रणेचा मेन्टेनन्स  (Maintenance) या कालावधीत केला जाणार आहे. ग्राहकांची कमीत कमी गैरसोय व्हावी म्हणून या मेन्टेनन्ससाठी मध्यरात्रीची वेळ निवडण्यात आली आहे. सेवा बंद राहण्याचा कालावधी फार मोठा नसला, तरी सध्या कोरोनामुळे कोणावरही रात्री-अपरात्री कोणत्याही कारणासाठी पेमेंट करण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच याची नोंद घेऊन ग्राहकांनी तयारीत राहण्याकरिता बँकेने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.

'केवायसी'संदर्भात सवलत

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाउन लागू केला जात आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेने केवायसी (KYC) अर्थात Know Your Customer साठीच्या कागदपत्रांच्या सादरीकरणासाठी सवलत दिली आहे. एरव्ही ही कागदपत्रं स्वतः जाऊन बँकेत सादर करावी लागतात. आता ग्राहकांनी ही कागदपत्रं ई-मेलद्वारे किंवा पोस्टाने पाठवली तरी चालणार आहेत. या बँकेने ही सुविधा सुरू केल्यामुळे बाकीच्या बँकाही ग्राहकांसाठी अशी सुविधा सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.

हे वाचा-तुमच्या मुलीसाठी 15 लाखांचं गिफ्ट! पूर्ण करा तिचं 'सुपरगर्ल' होण्याचं स्वप्न

ज्या ग्राहकांना बँकेकडून सेवा दिली जाते, त्या ग्राहकांची माहिती मिळवण्यासाठी बँका केवायसी कागदपत्रांची मागणी करतात. हाय रिस्क गटातल्या ग्राहकांना दोन वर्षांतून एकदा, मीडियम रिस्क गटातल्या ग्राहकांना आठ वर्षांतून एकदा, तर लो रिस्क गटातल्या ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी अपडेट करावं लागतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 7, 2021, 10:25 AM IST

ताज्या बातम्या