SBI नं ग्राहकांना केलं सावध, तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 'हे' करायलाच हवं

SBI, Banking - SBI नं ग्राहकांना आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही टिप्स दिल्यात

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 12:23 PM IST

SBI नं ग्राहकांना केलं सावध, तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 'हे' करायलाच हवं

मुंबई, 06 ऑगस्ट : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलंय. त्यांनी सांगितलंय की सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्याआधी सावध राहा. बँकेनं आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे नकली सोशल मीडिया अकाउंटपासून सांभाळून राहायला सांगितलंय. तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही सब्सक्राइब केलेल्या अशा अकाउंट्सला अनफाॅलो करा.

SBIचे सध्या 42 कोटी ग्राहक आहेत. एसबीआयनं सांगितलं की बँकेचे सर्व सोशल मीडिया अकाउंट व्हेरिफाइड आहेत. म्हणून फक्त ऑफिशियल अकाउंटला फाॅलो करा.

लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

SBI ची व्हेरिफाइड अकाउंट

Facebook: @StateBankOfIndia

Loading...

Instagram: @theofficialsbi

Twitter: @TheOfficialSBi

Linkedin: State Bank of India (SBI)

Youtube: State Bank of India

या गोष्टींची काळजी घ्या

1. SBI नं सांगितलं की सोशल मीडिया अकाउंटवरून कुठल्याही अधिकाऱ्यांना  किंवा बँकेला टॅग करण्याआधी अकाउंट व्हेरिफाइड आहे की नाही ते पाहा.

2. कुठल्याही तक्रारी किंवा माहितीसाठी चुकीच्या अकाउंटला किंवा अधिकाऱ्यांना टॅग करू नका.

ITR भरताना चूक केलीत तर ती 'अशी' सुधारा

3. अगोदर व्हेरिफाइड साइन चेक करा

4. एसबीआयनं सांगितलंय की सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर सतत नकली अकाउंट तयार होत असतात

5. अशात SBI च्या नावानं अनेक नकली अकाउंट तयार होत असतात

EPFO नं बदलला PF मधून पैसे काढण्याचा नियम, 'या' आहेत नव्या अटी

6. ऑफिशियल अकाउंट कुठलं आहे, याकडे लक्ष द्या

7. कुठलीही माहिती उघड करताना आणि आर्थिक देवाणघेवाण करताना पहिल्यांदा व्हेरिफाइड साइन चेक करा.

काहीही होण्याआधी लगेच फोन करा

SBIचं म्हणणं आहे की ऑनलाइन फ्राॅड आणि फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

तुमची फसवणूक झाली किंवा अनधिकृत आर्थिक व्यवहार झाला तर तुम्ही सरळ बँकेशी संपर्क करा

त्यासाठी SBI नं टोल फ्री नंबर शेअर केलाय. 1800112211 आणि 18004253800 वर काॅल करून तुमची तक्रार दाखल करू शकता.

VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SBI
First Published: Aug 6, 2019 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...