मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बचत खात्याचे हे प्रकार वाचा! म्हणजे तुम्हालाही कळेल फायद्याचं Saving Account कोणतं?

बचत खात्याचे हे प्रकार वाचा! म्हणजे तुम्हालाही कळेल फायद्याचं Saving Account कोणतं?

प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर नक्की किती देतात व्याजदर जाणून घ्या

प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर नक्की किती देतात व्याजदर जाणून घ्या

बँकांमध्ये (Bank) अकाउंटचे बरेच प्रकार असतात. मात्र, सेव्हिंग अकाउंट (savings account) आणि करंट अकाउंट (current account) या दोन प्रकारांविषयी तुम्हाला माहिती असणे फायदेशीर आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 25 नोव्हेंबर: सध्याच्या काळात सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट (Saving Account) म्हणजेच बचत खातं असणं आवश्यक आहे. गृहखरेदी, मुला-मुलींचे विवाह, आजारपण आदी गोष्टींसाठी आर्थिक तजवीज म्हणून प्रत्येकजण उत्पन्नातील काही रकमेची बचत करत असतो. या बचतीसाठी सेव्हिंग अकाउंट गरजेचं असतं. हे सेव्हिंग अकाउंट तुम्ही सरकारी, खासगी किंवा सहकारी बँकांमध्ये काढू शकता. बँकनिहाय सेव्हिंग अकाउंटचे काही नियम आणि प्रकार वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला गरजेनुसार सेव्हिंग अकाउंट सुरु करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

कोणत्याही प्रकारचं सेव्हिंग अकाउंट सुरु करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता संबंधित बँकेकडे करणं आवश्यक असतं. त्यात प्रामुख्यानं आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड (PAN Card), पत्त्याचा पुरावा (वीज बिल, टेलिफोन बिल) आदी दस्तावेजांचा समावेश असतो. गेल्या काही वर्षांत डिजीटल (Digital) व्यवहारांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे आता तुम्हाला डिजिटल सेव्हिंग अकाउंटचा (Digital Saving Account) पर्याय काही बँकांनी उपलब्ध करून दिला आहे. तसेच सेव्हिंग अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ऑनलाइन माध्यमातून तुम्ही केवायसीची (KYC) पूर्तता करून अकाउंट सुरू करू शकता. तसंच सेव्हिंग अकाउंटमधील रकमेवर तुम्हाला व्याजही मिळू शकतं. तत्पूर्वी, सेव्हिंग अकाउंटचे प्रमुख प्रकार कोणते आणि त्याचे फायदे काय याविषयी जाणून घेऊया.

कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी सेव्हिंग अकाउंट असणं आता अनिवार्य आहे. मात्र, सेव्हिंग अकाउंटचे काही प्रकार आहेत, गरजेनुसार तुम्ही या प्रकारातून योग्य पर्याय निवडू शकता.

बेसिक किंवा रेग्युलर सेव्हिंग अकाउंट (Basic Or Regular Saving Account) :  हा सेव्हिंग अकाउंटचा सर्वसाधारण प्रकार आहे. रक्कम सुरक्षित राहावी आणि बचत व्हावी या उद्देशानं कोणीही व्यक्ती हे अकाउंट सुरू करू शकते. मात्र, या अकाउंटमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम शिल्लक ठेवावी लागते, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Mutual Fund म्हणजे काय? जाणून घ्या म्युच्युअल फंडाविषयी महत्त्वाचं

सॅलरी बेस्ड सेव्हिंग अकाउंट (Salary Based Saving Account) : तुम्ही ज्या कंपनीत किंवा फर्ममध्ये नोकरी करता, ती कंपनी किंवा फर्म तुमचा पगार जमा करण्यासाठी हे अकाउंट सुरू करते. बऱ्याच बॅंकांच्या नियमानुसार, या खात्यावर ठराविक रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नसते. जर सलग 3 महिने या खात्यावर पगार जमा झाला नाही तर या खात्याचं रुपांतर आपोआप  सामान्य सेव्हिंग अकाउंटमध्ये होतं.

झिरो बॅलन्स अकाउंट (Zero Balance Account) : सेव्हिंग अकाउंटच्या विविध प्रकारांमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. सॅलरी बेस्ड सेव्हिंग अकाउंट आणि झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये फारसा फरक नाही. कारण याचा वापर नोकरदार वर्ग अधिक प्रमाणात करतात. अलिकडच्या काळात केंद्र सरकारनं झिरो बॅलन्स अकाउंट सुरु करण्यासाठी विशेष भर दिला आहे. ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकडे वेतनासाठी अकाउंट नाही, त्यांच्याकरिता हे अकाउंट सुरू केले जाते. यात रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही.

ATM कार्डची मुदत संपल्यानंतर तुम्हाला नवं कार्ड मिळालं नाही तर काय करायचं? SBI ने दिली महत्त्वाची माहिती

मायनर्स सेव्हिंग अकाउंट (Minors Saving Account) : सध्याच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. शालेय विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राची ओळख व्हावी, डिजीटल व्यवहारांविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने हे अकाउंट काढलं जातं. संबंधित पाल्य 10 वर्षांचा होईपर्यंत कायद्यानुसार पालकांच्या देखरेखीखाली हे अकाउंट चालवता येतं. यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची अट नाही. पाल्य 18 वर्षांचा झाल्यानंतर या अकाउंटचं रुपांतर रेग्युलर सेव्हिंग अकाउंटमध्ये होतं.

जॉईंट अकाउंट (Joint Account) : एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती एकाच अकाउंटमध्ये सेव्हिंग करु इच्छित असतील, तर त्यांच्यासाठी जॉईंट अकाउंट हा एक उत्तम पर्याय ठरतो. हे अकाउंट `आयदर ऑर सर्व्हायव्हर` (Either Or Survivor) या तत्वावर चालवता येतं. याचाच अर्थ या अकाउंटवरून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीही व्यवहार करू शकते. रेग्युलर सेव्हिंग अकाउंटप्रमाणेच या खातेधारकाला सर्व सुविधा दिल्या जातात.

सीनिअर सिटिझन सेव्हिंग अकाउंट (Senior Citizen Saving Account) : या अकाउंटची कार्यप्रणाली रेग्युलर सेव्हिंग अकाउंट प्रमाणेच असते. परंतु, या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अकाउंटमधील रकमेवर ज्यादा व्याज दर मिळतो. तसेच विशेष बॅंकिंग अधिकार मिळतात. हे अकाउंट संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्ती खातं किंवा पेन्शन फंडाशी (Pension Fund) तसेच अन्य योजनांशी लिंक केलं जातं. यामुळे संबंधित खातेधारकाला सर्व योजनांची रक्कम एकाच अकाउंटवर उपलब्ध होते.

तुमच्या बँकेतल्या अकाउंटचं Cash withdrawal limit किती असतं आणि ते कसं ठरतं?

वुमेन्स सेव्हिंग अकाउंट (Womens Saving Account)  : ज्येष्ठ नागरिक आणि मुलांप्रमाणेच महिलांनाही स्वतंत्र सेव्हिंग अकाउंट सुरू करता येतं. हे अकाउंट सुरु केल्यानंतर संबंधित महिलेला जमा रकमेवर 0.5 टक्के अधिक व्याज (Interest) तसंच अन्य सुविधा मिळतात. दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी महिलांना हे खातं सुरू करण्यासाठी बँका प्रोत्साहन देतात. खरेदीवर सूट, कर्जावर कमी व्याज दर, डिमॅट अकाउंट शुल्कावर सूट अशा सुविधाही महिलांना या अकाउंटच्या माध्यमातून मिळतात.

याशिवाय अनिवासी भारतीयांना (NRI) देखील सेव्हिंग अकाउंट सुरू करण्याची सुविधा अनेक बँका देतात. त्याचप्रमाणे प्रिव्हिलेज अकाउंट हा देखील नवा प्रकार काही बॅंकांनी सुरू केला आहे. या अकांउटमध्ये बचतीवर तुम्हाला जास्त व्याज दर मिळतो. मात्र अधिक व्याज दरासाठी तुम्हाला किमान रक्कम जास्त ठेवावी लागते.

First published:

Tags: Bank services, Saving bank account, बँक