मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bank Account: बचत खातं की चालू खातं? कोणतं अकाउंट तुमच्यासाठी अधिक चांगलं? वाचा सविस्तर

Bank Account: बचत खातं की चालू खातं? कोणतं अकाउंट तुमच्यासाठी अधिक चांगलं? वाचा सविस्तर

Bank Account: बचत खातं की चालू खातं? कोणतं अकाउंट तुमच्यासाठी अधिक चांगलं? वाचा सविस्तर

Bank Account: बचत खातं की चालू खातं? कोणतं अकाउंट तुमच्यासाठी अधिक चांगलं? वाचा सविस्तर

Saving Account And Current Account: बचत खातं लोकांना पैसे जमा करण्यास, पैशांची बचत करण्यास आणि त्यांच्या संपत्तीत वाढ होण्यास मदत करते. याशिवाय खातेधारकांना इतर व्यवहार करण्यास आणि बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासही मदत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 ऑगस्ट: देशातील सर्व बँका लोकांना अनेक प्रकारची खाती उघडण्याचा पर्याय देतात. यामध्ये लोक सर्वात जास्त बचत खातं आणि चालू खातं उघडण्यास प्राधान्य देतात. परंतु बहुतेक लोक बचत खातं उघडावं की चालू खातं उघडावं याबद्दल संभ्रमात असतात. कोणतं खातं तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल किंवा तुमच्यासाठी कोणता चांगला पर्याय असू शकतो, याबाबत मनात शंका असते.  तथापि, दोन्ही प्रकारच्या खात्यांचे वेगवेगळे फायदे आहेत.

बचत खातं (Saving Account)-

बचत खातं  लोकांना पैसे जमा करण्यास, पैशांची बचत करण्यास आणि त्यांच्या संपत्तीत वाढ होण्यास मदत होते. याशिवाय खातेधारकांना इतर व्यवहार करण्यास आणि बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासही मदत होते. हे खातं बहुतेक पगारदार लोक वापरतात. यामध्ये पैसे काढण्याची मर्यादा असते. ही मर्यादा बँकेद्वारे निर्धारित केली जाऊ शकते.

बचत खात्यावर व्याजाची सुविधाही दिली जाते. हे व्याज सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 2.75 ते 4 टक्के आणि खाजगी बँकांमध्ये 2.75 ते 6.75 टक्के असतं. त्याच वेळी, काही बँकांनी बचत खातं आरबीआयच्या रेपो दराशी जोडलेली आहेत. त्यामुळं रेपो दरात सुधारणा केल्यावर व्याजदर वाढेल.

चालू खाते (Current account)-

चालू खाते हे देखील बचत खात्याप्रमाणंच एक प्रकारचं ठेव खातं आहे, परंतु ते जास्त पैशांच्या व्यवहारांसाठी वापरलं जातं. हे खातं जे दररोज अधिक व्यवहार करतात असे व्यवसाय, उद्योजक, संस्था आणि इतर मोठ्या संस्थांद्वारे उघडलं जातं. तथापि, बचत खात्याच्या विपरीत, चालू खातं हे शून्य व्याजदर असणारं खातं आहे, परंतु खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान केली जाते.

हेही वाचा- LIC ची नवी योजना; कमी गुंतवणुकीत मिळवा 22 लाख रुपयांपर्यंतचे लाभ; चेक करा डिटेल्स

तुमच्यासाठी कोणतं खातं उघडणं जास्त फायदेशीर होईल?

  • व्याजदर: बचत खात्यांमध्ये खात्यात जमा केलेल्या रकमेवर वेगवेगळे व्याजदर असतात. अनेक डिजिटल बचत खाती देखील आहेत, जी सुरक्षिततेच्या हमीसह उच्च व्याज दरानं बँका देऊ करतात. चालू खात्यात जमा केलेल्या पैशांवर कोणतंही व्याज दिलं जात नाही.
  • किमान शिल्लक आणि अतिरिक्त शुल्क: बचत आणि चालू दोन्ही खात्यांवर देखभाल आणि पैसे काढण्याचं शुल्क असेल. ते बँकेवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकतात. तथापि, यासाठी तुम्हाला किमान शिल्लक राखणं आवश्यक असतं,  हे माहित असायला हवं आणि तुम्ही ते राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड आकारला जाईल. बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक आवश्यकता कमी असते, तर चालू खात्यांमध्ये किमान शिल्लक आवश्यकता जास्त असते. चालू खात्यांसह, तुम्हाला ओव्हरड्राफ्ट शुल्क देखील विचारात घ्यावं लागेल.
  • व्यवहारांची संख्या: बचत खात्यांमध्ये पैसे काढण्यावर मर्यादा आहेत. ठराविक वेळेपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास  त्यावर शुल्क आकारले जाऊ शकते, तर चालू खात्यांमध्ये करता येणाऱ्या व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा नाही.

First published:

Tags: Bank services, Saving bank account