मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Saving Tips: पगार मोठा, पण बचत शून्य! 'या' खास पद्धतीनं करा पैशांचं नियोजन, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

Saving Tips: पगार मोठा, पण बचत शून्य! 'या' खास पद्धतीनं करा पैशांचं नियोजन, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

Saving Tips: पगार मोठा, पण बचत शून्य! ‘या’ खास पद्धतीनं करा पैशांचं नियोजन, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

Saving Tips: पगार मोठा, पण बचत शून्य! ‘या’ खास पद्धतीनं करा पैशांचं नियोजन, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

Saving Tips: बचत, खर्च आणि गुंतवणूक यांचा योग्य मेळ घालणं गरजेचं आहे. कारण या सर्वांचा थेट संबंध तुमच्या भविष्याशी आहे.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 25 जुलै: बचत आणि खर्च एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बचत (Saving) करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते. आपल्या सभोवताली असे अनेक लोक आपण पाहतो, ज्यांचा पगार किंवा कमाई लाखांत असते, पण बचत मात्र काहीच नसते. थोडक्यात ते जेवढं कमावतात, ते सर्व खर्च होतात. वास्तविक कुणी किती बचत करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. काहीवेळा कमी उत्पन्न मिळवणारे देखील मोठ्या प्रमाणात बचत करतात, तर काही लोकांना चांगला पगार मिळूनही बचत करता येत नाही. परंतु तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल किती जागरूक असाल, तर तुम्ही बचत करायला हवी.. त्यासाठी बचत, खर्च आणि गुंतवणूक यात समतोल राखला पाहिजे. उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखण्याची गरज (balance between income and expenditure)- बरेच लोक तक्रार करतात की, ते भरपूर कमावतात, पण पैसा कुठं खर्च होतो, हे कळत नाही. हे संपूर्ण प्रकरण मिस मॅनेजमेंटचं आहे. अशा लोकांकडं खर्चाची कोणतीही यादी नसते. आज आम्ही तुम्हाला बचत, खर्च आणि गुंतवणूक याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. हे तिन्ही गोष्टी थेट तुमच्या बँक खात्यांशी संबंधित आहेत. तुम्ही नोकरी करत असाल किंवा कोणत्याही नोकरीशी संबंधित असाल, या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडं किमान तीन बँक खाती असणं आवश्यक आहे. 1. पहिलं खातं (1st Account): तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला पगार मिळेल, जो खात्यात जमा केला जाईल. जर तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्याकडे नक्कीच चालू खाते असेल. पगार खात्याला उत्पन्न खातं असंही नाव दिलं जाऊ शकतं. गुंतवणुकीची पहिली पायरी म्हणून, पगाराव्यतिरिक्त, तुमचं जे काही उत्पन्न आहे ते दरमहा या खात्यात टाका. ज्याद्वारे तुम्हाला तुमचं एकूण उत्पन्न किती आहे हे कळेल. हेही वाचा- LIC Policy: ‘या’ पॉलिसीमध्ये जमा करा पैसे, चार वर्षात व्हाल करोडपती; पाहा डिटेल्स 2. दुसरं खातं (2nd Account): पहिल्या बँक खात्यातून, जेव्हा तुम्हाला समजेल की उत्पन्न किती आहे, त्यानंतर महिन्याचा खर्च दुसर्‍या बँक खात्यात हस्तांतरित करा. म्हणजेच, दुसरं खातं खर्चाचं खातं म्हणून ओळखलं जाईल. त्याला खर्चाचं खातं असं नाव देता येईल. या खात्यात महिन्याच्या खर्चाची रक्कम असेल. त्यातील गरजेनुसार तुम्ही खर्च करू शकाल. 3. तिसरं खातं (3rd Account): जेव्हा तुम्ही बचत आणि खर्च यात संतुलन साधता तेव्हा तुमची पुढची पायरी गुंतवणुकीची असते.म्हणजेच पहिल्या खात्यात (बचत) जी काही रक्कम शिल्लक राहते, ती खर्च केल्यानंतर तुम्ही ती कुठेही गुंतवू शकता. पण ती गुंतवणूक करण्यासाठी , तुम्हाला स्वतंत्र बँक खाती आवश्यक असतील. गुंतवणुकीपूर्वी, तुम्‍हाला दरमहा किती गुंतवायचे हे ठरवावं लागेल आणि ती रक्कम थेट पहिल्या खात्यातून तिसर्‍या खात्यात म्हणजेच गुंतवणूक खात्यात हस्तांतरित करावी लागेल. त्यानंतर दर महिन्याला या खात्यातून गुंतवणूक करा. तथापि, सुरुवातीला मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरू करू नका, यामुळे तुमचं घराचं बजेट बिघडू शकतं. उत्पन्न वाढलं की हळूहळू गुंतवणूक वाढवा. म्हणजेच एकूण, तुमची तीन बँक खाती असावीत. पहिल्यामध्ये उत्पन्नाचे विवरण, दुसऱ्यामध्ये महिन्याच्या खर्चाचा हिशेब आणि तिसऱ्यामध्ये गुंतवणुकीसाठी निधी असावा. जेव्हा तुम्ही ही दिनचर्या 6 महिने सतत पाळाल, तेव्हा तुमची तक्रार दूर होईल की उत्पन्न पुरेसं आहे. मात्र हा पैसा कुठे खर्च झाला हे कळत नाही.
First published:

Tags: Saving bank account, Savings and investments

पुढील बातम्या