• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • अशाप्रकारे गुंतवणूक केल्यास व्हाल कोट्यवधींचे मालक! वाचा काय आहे सिक्रेट

अशाप्रकारे गुंतवणूक केल्यास व्हाल कोट्यवधींचे मालक! वाचा काय आहे सिक्रेट

जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला आतापासूनच सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी महत्त्वाची पावलं उचलावी लागतील

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: जर तुम्ही गुंतवणुकीची योजना (Investment Planning) आखत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला आतापासूनच सेवानिवृत्तीनंतरच्या (Investment for Retirement) जीवनासाठी महत्त्वाची पावलं उचलावी लागतील. निवृत्तीच्या वयापर्यंत तुमच्याकडे किमान एवढी रक्कम असली पाहिजे जेणेकरून वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्ही तुमचे जीवन आरामात जगू शकाल.  जर तुम्हाला निवृत्तीपूर्वी भरपूर पैसे जमा करायचे असतील तर गुंतवणूक करण्याला पर्याय नाही. 10 लाख रुपयांच्या चांगल्या गुंतवणुकीसह, तुम्ही निवृत्तीनंतर 100 कोटी रुपयांपर्यंत कमवू शकता. जाणून घ्या गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती आणि तुम्हाला फायदा कसा मिळेल. जाणून घ्या गुंतवणूक कशी कराल? जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी कंपाउंडिंगद्वारे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ती 20% दराने चक्रवाढीनुसार तुमची गुंतवणूक वयाच्या 65 व्या वर्षी 99 कोटी रुपये होईल. थोडे अधिक स्पष्टपणे जाणून घ्यायचे झाले तर, समजा तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी 1 लाख रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक 15 % दराने चक्रवाढ झाली, तर तुम्ही 60 वर्षांचे होईपर्यंत तुमची गुंतवणूक अनेक पटींनी वाढून कोट्यवधी होईल. खरं तर, हे करण्यासाठी तुम्हाला आर्थिक तज्ज्ञ असण्याची गरज नाही. कोणीही त्याच्या फायद्यासाठी कंपाऊंड पॉवर वापरू शकतो आणि त्यासाठी त्याला पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य आहे. हे वाचा-सामान्यांना परवडणारं आहे का आजचं पेट्रोल? जाणून घ्या 1 लीटर इंधनाचे दर तुम्ही कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता समजा एखाद्या व्यक्तीने 2001 मध्ये आयशर मोटर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज ती व्यक्ती मालामाल झालेली असेल.  कारण आज ही किंमत 1,45,19,274 रुपयांवर पोहोचली आहे. तसंच समजा एखाद्याने 1980 मध्ये विप्रो शेअर्समध्ये 10000 रुपये गुंतवले असतील तर त्याचे आज  41% चक्रवाढ वार्षिक वाढ दरासह 801 कोटी झालेत. गेल्या 10 वर्षांत 100 हून अधिक कंपन्या आहेत ज्यांनी सातत्याने 15% ते 50% पर्यंत नफा मिळवून दिला आहे. अशा परिस्थितीत येथे गुंतवणूक करता येते. (Disclaimer: बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: