पहिल्या पगाराचे पैसे खर्च करण्याआधी या 5 गोष्टी ठेवा लक्षात

पहिल्या पगाराचे पैसे खर्च करण्याआधी या 5 गोष्टी ठेवा लक्षात

तुम्ही महिन्याभराचं बजेट ठरवा. तुम्हाला किती पैसे मिळतात त्यानुसार किती खर्च करायचे याचा हिशोब मांडा. हे बजेट पगारापेक्षा जास्त झालं तर तुमच्या मेहनतीचे पैसे नेमके कुठे खर्च होतात ते शोधून काढा.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : आपल्या करिअरमधला पहिला पगार सगळ्यांनाच आठवतो. या पहिल्या पगारापासूनच चांगल्या सवयी लावून घेतल्या तर चांगली बचत होऊ शकते. अशाच काही गोष्टी तुमच्या पहिल्या पगारासाठी....

सगळ्यात पहिल्यांदा बजेट बनवा

तुम्ही महिन्याभराचं बजेट ठरवा. तुम्हाला किती पैसे मिळतात त्यानुसार किती खर्च करायचे याचा हिशोब मांडा. हे बजेट पगारापेक्षा जास्त झालं तर तुमच्या मेहनतीचे पैसे नेमके कुठे खर्च होतात ते शोधून काढा.

सुरुवातीपासूनच करा बचत

तुमच्या सगळ्या खर्चांची गरज भागली की मग काही पैसे बचतीसाठी जरूर काढून ठेवा. यामुळे तुम्हाला कमी खर्च करण्याची सवय लागेल. त्याचबरोबर गरज असेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्याकडून मदत घ्यावी लागणार नाही. तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर तुमच्या कुटुंबालाही मदत करू शकता.

गुंतवणूक करायला शिका

तुम्ही ज्या पैशांची बचत कराल ते पैसे तुमच्याजवळच न ठेवता ते पैसे गुंतवा. त्यामुळे तुमचे पैसे वाढतील. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, फिक्स डिपॉझिट किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवा. अशा ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर तुमचे पैसे वाढतील आणि सुरक्षितही राहतील.

सावधान!पाकिस्तानमध्ये छापल्या जातायत 2 हजार रुपयांच्या नकली नोटा

क्रेडिट कार्डचा वापर करू नका

पगार सुरू झाला की बरेच जण क्रेडिट कार्ड काढून घेतात. पण त्यामुळे जास्त खर्च करायची सवय होते. क्रेडिट कार्डची बिलं भरताभरता तुम्ही कर्जबाजारी होण्याचा धोका असतो.

काही पैसे इमर्जन्सीसाठी राखून ठेवा

तुमच्या कमाईपैकी काही पैसे इमर्जन्सी फंडसाठी राखून ठेवा. काही वेळा अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी हा इमर्जन्सी फंड वापरता येतो.

============================================================================================================

SPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरून युतीमध्ये तूतू-मैमै!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 08:17 PM IST

ताज्या बातम्या