Elec-widget

असे व्हा श्रीमंत : रोज 50 रु. वाचवा आणि 10 लाख रुपये मिळवा

असे व्हा श्रीमंत : रोज 50 रु. वाचवा आणि 10 लाख रुपये मिळवा

तुम्ही जर रोज काही रुपयांची बचत केलीत तर काही काळानंतर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. दिवसाला अगदी 50 रुपये वाचवलेत तरी 10 लाख रुपये मिळू शकतात आणि हे शक्य आहे. अशी बचत करून तुम्ही लखपती होऊ शकता.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : तुम्ही जर रोज काही रुपयांची बचत केलीत तर काही काळानंतर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. दिवसाला अगदी 50 रुपये वाचवलेत तरी 10 लाख रुपये मिळू शकतात आणि हे शक्य आहे. अशी बचत करून तुम्ही लखपती होऊ शकता.

तुम्ही रोज 50 रुपये बाजूला काढलेत तर महिन्याला 1500 रुपयांची बचत होते. हे 1500 रुपये चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवलेत तर SIP च्या माध्यमातून चांगला फायदा मिळू शकतो. काही म्युच्युअल फंडात 15 वर्षांसाठी दरवर्षी 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात. या गणितानुसार तुमच्याकडे 10 लाख रुपये जमा होतील.

तुम्ही जर कोणत्याही म्युच्युअल फंडात 15 वर्षं गुंतवणूक केलीत तर तुमची गुंतवणूक 2 लाख 70 हजार रुपयांची असेल. त्याचवेळी SIP ची एकूण किंमत 10 लाख 2 हजार760 रुपये होईल. म्हणजे या गुंतवणुकीत तुम्हाला 7 लाख 32 हजार 760 रुपयांचा फायदा होऊ शकतो.

SIP मध्ये करा गुंतवणूक

SIP हा म्‍युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. यामध्ये धोका कमी आहे आणि फायदाही चांगला होऊ शकतो. तसंच ही गुंतवणूक तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बंदही करू शकता. असं केलं तरी दंड भरावा लागत नाही.

Loading...

रोज 50 रुपयांची बचत केली तर तुमच्या महिन्याच्या बजेटवरही ताण येणार नाही आणि महिन्याच्या शेवटी बचत करण्यासाठी चांगली रक्कम हातात येईल.म्युच्यअल फंडमधल्या रिटर्न्सचे पर्याय पाहिले तर मिडकॅप फंड, फ्रँकलिन इंडिया, प्राइमा फंड, आदित्य असे चांगले पर्याय आहेत.

============================================================================================

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...