• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Sapphire Foods IPO: आज शेअर्स अलॉटमेंट, GPM किती? स्टेटस कसं चेक कराल?

Sapphire Foods IPO: आज शेअर्स अलॉटमेंट, GPM किती? स्टेटस कसं चेक कराल?

सॅफायर फूड्स (Sapphire Foods IPO) या कंपनीच्या शेअर्सचे वाटप आज होणार आहे. कंपनीने 2,073.25 कोटी शेअर जारी केले होते. आता एकदा शेअर्सचे वाटप झाल्यानंतर तुम्ही वाटपाचं स्टेटस ऑनलाईन तपासू शकता.

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर : पिझ्झा हट आणि केएफसी (Pizza Hut and KFC) सारखी रेस्टॉरंट चालवणाऱ्या सॅफायर फूड्स (Sapphire Foods IPO) या कंपनीच्या शेअर्सचे वाटप आज होणार आहे. कंपनीने 2,073.25 कोटी शेअर जारी केले होते. आता एकदा शेअर्सचे वाटप झाल्यानंतर तुम्ही वाटपाचं स्टेटस ऑनलाईन तपासू शकता. सॅफायर फूड्सचे रजिस्ट्रार कंपनी Link Intime आहे, त्यामुळे तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही हे देखील तुम्ही त्याद्वारे तपासू शकता. BSE द्वारे कसं चेक कराल? >> सर्व प्रथम https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर क्लिक करा. >> या लिंकवर क्लिक केल्यानंतर स्टेटस ऑफ इश्यू अॅप्लिकेशनचे पेज उघडेल. त्यावर इक्विटी पर्याय निवडा. >> ज्या कंपनीसाठी तुम्हाला IPO चे Allotment तपासायचे आहे त्या कंपनीचे नाव निवडा. >> त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका. याच्या खाली तुम्हाला तुमच्या पॅनचा तपशील द्यावा लागेल. >> यानंतर, I am not a robot च्या बॉक्सवर क्लिक करून तुमची पडताळणी करा. >> यानंतर सर्च बटण दाबा आणि स्टेटस तुमच्या समोर येईल. अबब! कृषी मेळाव्यात तब्बल 1 कोटींचा बैल, एवढ्या किंमतीमागे आहे मोठं कारण तुम्हाला रजिस्ट्रार कंपनी LinkIntime द्वारे वाटप तपासायचे असेल तर तुम्ही याप्रमाणे तपासू शकता. >> सर्वप्रथम https://linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html या लिंकवर क्लिक करा. >> यानंतर, ड्रॉपबॉक्समध्ये IPO चे नाव निवडा ज्याची वाटप स्थिती तपासायची आहे. >> पुढे तुम्ही अर्ज क्रमांक, क्लायंट आयडी, PAN या तीन पैकी कोणतीही एक माहिती देऊन स्टेटस तपासू शकता. >> त्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रकार निवडा. म्हणजेच ASBA किंवा Non-ASBA यापैकी एक निवडा. >> तुम्ही जो मोड निवडाल त्यानुसार तुम्हाला त्याखाली माहिती द्यावी लागेल. >> त्यानंतर कॅप्चा भरा आणि सबमिट करा. IPO अलॉटमेंटची स्थिती तुमच्या समोर उघडेल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: