मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सॅमसंगचा चीनला 'दे धक्का', भारतात उभारणार सर्वात मोठा उद्योग

सॅमसंगचा चीनला 'दे धक्का', भारतात उभारणार सर्वात मोठा उद्योग

चीनबाबत भारताने कडक धोरण अवलंबल्यानंतर आता दक्षिण कोरियानेही चीनला धक्का दिला आहे. दक्षिण कोरिया सॅमसंगचा एक मोठा प्रकल्प भारतात आणणार आहे. कुठे असेल हा कारखाना?

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर : चीनसोबत (china) सीमेवर उडालेल्या गंभीर चकमकीनंतर भारत सरकारने अनेक चायनीज अॅप्सवर पूर्वीच बंदी आणली आहे. यामुळे चायनीज कंपन्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागते आहे. चीनचीही यातून कोंडी झाली आहे. आता दक्षिण कोरिया इथली बलाढ्य स्मार्टफोन कंपनी सॅमसंगनेही (Samsung) चीनला मोठा झटका दिला आहे. चीनमधील आपली डिस्प्ले फॅक्ट्री तिथून हलवत सॅमसंग भारतात (India) आणणार आहे. यासंदर्भात नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक झाली. यात ही फॅक्ट्री नोएडा इथं उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. सॅमसंग आपली फॅक्ट्री चीनवरून नोएडा इथं हलवणार आहे. यासाठी 4825 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारचे एक प्रवक्ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, की हा सॅमसंगचा भारतातील पहिला हायटेक पप्रोजेक्ट आहे. भारत यामुळे जगातील अशा प्रकारचं युनिट असलेला तिसरा देश बनेल. हा प्रकल्प पूर्णपणे सुरू झाल्यावर एकूण 510 लोकांना इथं रोजगार मिळणार आहे. या फॅक्ट्रीमध्ये सॅमसंग मोबाईलसह टीव्ही, टॅबलेट, घडी अशा डिव्हाइसेसचे 70 टक्के डिस्प्ले प्रॉडक्ट्स बनणार आहेत. सध्या सॅमसंगचं युनिट चीनसह दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम इथं आहे. सॅमसंगनं भारतात कारखाना उभारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018 मध्ये जुलै महिन्यात कंपनीनं नोएडातच आपलं युनिट उभारलं होतं. ही जगातली आजवरची सगळ्यात मोठी मोबाईल फॅक्ट्री ठरली. 35 एकरांवर ही फॅक्ट्री उभी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिपब्लिक ऑफ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई इन यांनी या युनिटचं उद्घाटन केलं होतं. याशिवाय देशात श्रीपेरुम्बुदूर इथंही सॅमसंगचं युनिट आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, India, Samsung

    पुढील बातम्या