बापरे, 1000 लोकांना कामावरून काढून टाकणार ही टेलिकाॅम कंपनी

samsung, jobs, money - एक मोठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत नारळ देणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 02:50 PM IST

बापरे, 1000 लोकांना कामावरून काढून टाकणार ही टेलिकाॅम कंपनी

मुंबई, 02 जुलै : चिनी मोबाइल कंपन्या इतर मोबाइल कंपन्यांना चांगलीच टक्कर देतायत. याचा परिणाम आता सगळीकडे पाहायला मिळतोय. कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगनं भारतातल्या आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचं ठरवलं आहे. कंपनी आपल्या 1000 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. याआधीही सॅमसंगनं मार्जिन आणि फायद्यात कपात केली होती.

इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार देशातली सर्वात मोठी कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक्स आणि मोबाइल फोन बनवणारी कंपनी सॅमसंगनं कर्मचारी कपात करायचं ठरवलंय. त्यांनी सांगितलं की सॅमसंगनं आतापर्यंत टेलिकाॅम डिव्हिजनमधल्या 150 कामगारांना नोकरीवरून काढून टाकलंय. आॅक्टोबरपर्यंत आणखी लोकांची नोकरी जाऊ शकते.

LIC कडे तुमचे पैसे पडून तर नाहीत? घरबसल्या करा चेक

या विभागात होईल कपात

कुठल्या डिपार्टमेंटमधल्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते हे आधीच ठरलं. यात सेल्स, मार्केटिंग, आर अँड डी, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, एचआर, काॅर्पोरेट रिलेशन्स या विभागांचा समावेश आहे. सॅमसंग इंडियामध्ये एप्रिलपासून भरती बंद आहे.

Loading...

दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय

गेल्या वर्षापासून सुरू झाली समस्या

2017-18मध्ये सॅमसंग इंडियामध्ये समस्या सुरू झाल्यात. त्यांचा नफा घसरलाय. भारतात शाओमी आणि वन प्लससारखे चिनी ब्रँड जास्त लोकप्रिय आहेत. सॅमसंगच्या विक्रीवर परिणाम होतोय. म्हणूनच कंपनीला आपल्या फोन आणि टीव्हीच्या किमती 25 ते 40 टक्के कमी कराव्या लागल्या. भारतीय स्मार्टफोनच्या बाजारात शाओमीची भागीदारी 29 टक्के, सॅमसंगती 23 टक्के आणि विवोची 12 टक्के आहे.

मुंबईकरांनो, धोका अजून टळला नाही; हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की सॅमसंग एसडीआय इंडियाही भारतात लिथियम आयन बॅटरी प्लान्ट सुरू करणार आहे. यासाठी भारतात 900-1000 कोटींची गुंतवणूक केलीय. निवडणुकीनंतर कंपनी केंद्र सरकारशी बोलून याला अंतिम स्वरूप देईल.

सॅमसंगनं गेल्या वर्षी भारतात आपल्या सर्वात मोठ्या प्लान्टचं उद्घाटन केलं होतं. तो पुढच्या वर्षी पूर्ण होईल. यासाठी 4 915 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, बुडता बुडता वाचले 2 बाईकस्वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: samsung
First Published: Jul 2, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...