मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Idea: देशात कुठेही करा 'या' पिकाची शेती, महिन्याला होईल सहा लाखांपर्यंतची कमाई

Business Idea: देशात कुठेही करा 'या' पिकाची शेती, महिन्याला होईल सहा लाखांपर्यंतची कमाई

Business Idea: आता उत्तर प्रदेश, हरियाणा एवढंच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यांमध्येही केशराची शेती (Saffron Farming) केली जात आहे.

Business Idea: आता उत्तर प्रदेश, हरियाणा एवढंच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यांमध्येही केशराची शेती (Saffron Farming) केली जात आहे.

Business Idea: आता उत्तर प्रदेश, हरियाणा एवढंच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यांमध्येही केशराची शेती (Saffron Farming) केली जात आहे.

नवी दिल्ली, 13 जून: केशर शेती हा शब्द वाचून तुमच्या डोक्यात सर्वांत आधी जम्मू-काश्मीरचा विचार आला असणार. कारण आतापर्यंत केशराचं उत्पादन हे याच भागात घेतलं जात होतं. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आता उत्तर प्रदेश, हरियाणा एवढंच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यांमध्येही केशराची शेती (Saffron Farming) केली जात आहे. यामध्ये होणारा फायदा पाहून कित्येक युवकही केशर शेतीकडे वळत आहेत. जर तुम्हीदेखील भरपूर फायदा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात (Business idea) असाल, तर केशर शेती हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. महिन्याला सहा लाखांपर्यंत कमाईची संधी केशर शेती ही कमी खर्चामध्ये भरपूर फायदा (Saffron farming tips) देणारी ठरू शकते. केशराचा सध्याचा भाव हा सुमारे अडीच ते तीन लाख रुपये प्रतिकिलो (Saffron rate per kg) इतका आहे. तुम्ही एका महिन्यात दोन किलो केशर जरी विकलं, तरी तुम्हाला त्यातून सहा लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. चांगलं पॅकिंग करून आजूबाजूच्या मार्केटमध्ये, किंवा मग थेट ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतींनी तुम्ही केशर विकू (Where to sell Saffron) शकता. कशा प्रकारची जमीन हवी? जम्मू-काश्मीर भागाव्यतिरिक्त इतर देशभरात केशराची शेती शक्य असली, तरी ठराविक प्रकारच्या जमिनीतच (Saffron farming conditions) ती होऊ शकते. सर्वांत आधी तर ती जमीन समुद्रसपाटीपासून सुमारे 3,000 मीटर उंचीवर असायला हवी. ज्या ठिकाणी थोडेसं उष्ण हवामान आहे, अशा ठिकाणी केशराची शेती होऊ शकते. जिथे भरपूर थंडी वा पाऊस आहे असं ठिकाण फायद्याचं नाही. केशराच्या रोपांची लागवड करण्यासाठी वालुकामय अशी किंवा चिकणी माती असणं गरजेचं आहे. जी जमीन पाणी जास्त धरून ठेवत नाही, अशा जमिनीत केशरची शेती केली जाऊ शकते. यासाठी 10 व्हॉल्व्ह बियांचा वापर केला जातो, ज्यांची किंमत साधारणपणे 550 रुपये आहे. हा व्हॉल्व्ह लसणाच्या गड्ड्यासारखा दिसतो. कोणत्या महिन्यात केली जाते शेती जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे चार महिने केशर शेतीसाठी उत्तम मानले जातात. ऑक्टोबर महिन्यात (Saffron farming season) केशराच्या रोपांना फुलं लागतात. अर्थात, तुम्ही कोणत्या ठिकाणी शेती करत आहात यानुसार हा कालावधी बदलतो. उंच डोंगराळ भागांमध्ये केशरची शेती करण्यासाठी योग्य काळ जुलै-ऑगस्ट हा असतो. तर मैदानी भागांमध्ये फेब्रुवारी-मार्च या महिन्यांमध्ये केशरचे बी पेरलं जातं. एकूणच, आवश्यक तशी जमीन उपलब्ध असल्यास तुम्ही देशात कुठेही केशराची शेती करू शकता. केशराची मागणी (Saffron demand) ही भारतात जेवढी आहे, त्यापेक्षा अधिक परदेशात आहे. जगातील सर्वांत महागड्या मसाल्यांपैकी एक समजलं जाणारं हे केशर, तुम्हालाही मालामाल करू शकतं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Business News, Farmer, Small business, Start business

पुढील बातम्या