मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Russia-Ukraine War: फोन आणि कार उत्पादनातील 'या' वस्तूवरही युद्धाचं सावट, परिणामी तुमच्या खिशाला चाप

Russia-Ukraine War: फोन आणि कार उत्पादनातील 'या' वस्तूवरही युद्धाचं सावट, परिणामी तुमच्या खिशाला चाप

पॅलेडियम धातूची किंमतही जगभरात झपाट्याने वाढू लागली आहे. रशिया या पॅलेडियमचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पॅलेडियमशी संबंधित गोष्टींच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असं म्हटलं जातंय.

मुंबई, 25 फेब्रुवारी: रशियानं गुरुवारी युक्रेनविरोधात (Russia-Ukraine war) युद्धाची घोषणा केली. युद्धाच्या पहिल्याच दिवशी रशियानं युक्रेनवर हल्ला करत 11 एअरड्रोमसह जमिनीवरील सुमारे 74 लष्करी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. रशियन सैन्यानं गुरुवारी युक्रेनवर मोठा हल्ला केला. हवाई हल्ले आणि गोळीबारात तेथील शहरे आणि तळांना लक्ष्य केलं. दोन्ही देशांमधील या युद्धाचे परिणाम जगातल्या अनेक देशांसह भारतातही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात (share market) मोठी घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात 2702 अंकांची घसरणी झाली तर रशियन बाजारही 50% खाली गेला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती आहे. तर पॅलेडियम धातूची किंमतही जगभरात झपाट्याने वाढू लागली आहे. रशिया या पॅलेडियमचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पॅलेडियमशी संबंधित गोष्टींच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असं म्हटलं जातंय. हे वाचा-Russia Ukraine Crisis: क्रूड ऑइलसह सोने, सोयाबीन, गहू आणि मक्याच्या किमतीतही वाढ पॅलेडियम म्हणजे नेमकं काय? पॅलेडियम (Palladium) एक चमकदार पांढरा धातू (white metal) आहे. हा प्लॅटिनम, रुथेनियम, रोडियम, ऑस्मियम, इरिडियम या धातुंच्या गटाचा भाग आहे. हा धातू रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचा वापर ट्रकसारख्या मोठ्या वाहनांमध्ये प्रदूषण नियंत्रण उपकरणं (Pollution control equipment) बनवण्यासाठी केला जातो. एका वर्षात या धातुची किंमत दुपटीने वाढली आहे. सद्यस्थितीत त्याची किंमत सोन्याहून (gold rates) अधिक आहे. पॅलेडियम महाग असण्याचं कारण? पॅलेडियम हा जगातील सर्वांत महाग धातू आहे. या धातूचा पुरवठा आणि मागणी यातील तफावत मोठी आहे. उत्सर्जनाच्या नियमांबाबत सरकार कठोर निर्णय घेत असल्याने त्याचा वापर वाढत आहे. परिणामी वाहन उत्पादकांना प्रदूषण नियंत्रक उपकरणं बनवण्यासाठी या मौल्यवान धातूचा वापर वाढवावा लागत आहे. या धातूचा तुटवडा कायम असून धातू कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने मागणीइतका पुरवठा होत नाही. हे वाचा-शेअर बाजाराला रशिया-युक्रेन युद्धाची झळ, गुंतवणूदारांचं 13 लाख कोटींचं नुकसान पॅलेडियमचा वापर पेट्रोल आणि हायब्रीड वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये वापरले जाणारे कॅटेलिटिक कन्व्हर्टर (Catalytic converter ) पॅलेडियमपासून बनवले जातात. 80% पॅलेडियमचा वापर कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड सारख्या विषारी वायूंचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड सारख्या कमी हानिकारक वायूंमध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो. याशिवाय पॅलेडियमचा वापर मोबाईल फोन (mobile phone), इलेक्ट्रिक उपकरणे (electric device), दातांसंबंधी उपचार आणि दागिन्यांमध्ये केला जातो. त्यामुळे या वस्तुंच्या किमतीही कदाचित वाढू शकतील.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

पुढील बातम्या