मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डॉलरचा 'भाव' वाढला तर रुपया गडगडला! मोठ्या संकटाचे संकेत तर नाही?

डॉलरचा 'भाव' वाढला तर रुपया गडगडला! मोठ्या संकटाचे संकेत तर नाही?

सलग दुसऱ्या दिवशी रुपयाचं मूल्य घसरलं आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी रुपयाचं मूल्य घसरलं आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी रुपयाचं मूल्य घसरलं आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी रुपयाचं मूल्य घसरलं आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. मागच्या वीस वर्षातील सगळे रेकॉर्ड रुपयाने मोडले आहेत. एका डॉलरसाठी आता ८१ रुपये मोजावे लागणार आहेत. डॉलरचा भाव वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात जीवनावश्यक वस्तूंपासून ते इतर वस्तूंपर्यंत सगळ्याच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. महागाईच्या झळा सणासुदीच्या तोंडावर अधिक तीव्र बसण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या दिवश रुपया घसरला आहे. त्यामुळे याचा फटका भारताला बसू शकतो. भारतात जास्त वस्तूंची आयात होते. येत्या काळात इंधन, डाळीसोबत इतर गोष्टींचे दर वाढण्याची शक्यता आहे. तर याचा सर्वात जास्त फायदा IT सेक्टरला होऊ शकतो अशी चर्चा आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांनी कमजोर होऊन 81.09 वर उघडला. या वर्षात आतापर्यंत रुपया 8.48 टक्क्यांनी घसरल्याचं सांगितलं जात आहे. BOE ने ०.५ टक्के व्याजदर वाढवलं आहे. सलग सातव्यांदा ही व्याजदर वाढ केली. तर स्विस नॅशनल बँकेनं ०.५ टक्के व्याजदर वाढवलं आहे. फेड बँकेनं ०.७५ टक्के व्याजदर वाढवला आहे. जागतील सेंट्रेल बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केल्यानं त्याचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला बसला आहे. इक्विटी बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स एक टक्क्याने कोसळला. तर निफ्टीमध्ये ९०० अंकांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ऑटो-रियल्टी, एनर्जीमध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळालं.
First published:

पुढील बातम्या