Home /News /money /

Rupay कार्डवर 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, करावं लागेल हे काम

Rupay कार्डवर 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, करावं लागेल हे काम

RuPay कार्डवर मिळणार 10 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स कवर. जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया.

    मुंबई, 05 जानेवारी: नव्या वर्षात Pm modi सरकारनं ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. रुपे (RuPay) आणि UPI ट्रान्झाक्शनवर लागणारं अतिरिक्त शुल्क (मर्चेंट डिस्काऊंट रेट) बंद करण्यात आलं आहे. म्हणजेच कोणत्याही ट्रान्झाक्शनसाठी आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. यासोबतच रूपे (RuPay) कार्डवर 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. मोदी सरकारनं (Narendra Modi Government)कॅशलेस इकोनॉमी (Cashless Economy) करण्यावर भर दिला होता. त्यानुसार आता कॅशलेस करण्यावर सरकारकडून अधिक भर दिला जात आहे. नव्या वर्षात pm modi सरकारकडून दोन मोठे निर्णय एनपीसीआई (NPCI)द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या रूपे (RuPay) कार्डवर 16 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे. संयुक्त अरब अमीरत, सिंगापुर, श्रीलंका, ब्रिटेन, अमेरिका, स्पेन, स्विट्जरलँड आणि थायलंडला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना खास या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. महिन्याला 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो असं NPCI द्वारे सांगण्यात आलं आहे. तुमच्याजवळ हे कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते अॅक्टिवेट करायला हवं. कारण ही ऑफर काही ठराविक काळापुरती मर्यादित असणार आहे. महिन्याभरासाठी तुम्ही या कार्डमधून 4 वेळा पैसे काढू शकता. तुम्हाला किमान 1 हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार करणं आवश्यक आहे. 1000 रुपयांवर तुम्हाला 4 हजारापर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हेही वाचा-HDFC ने ग्राहकांना दिली नव्या वर्षाची भेट, आता दर महिन्याला होणार बचत हे तुम्हाला माहीत आहे का? रुपे (RuPay) हा शब्द दोन इंग्रजी शब्दांपासून तयार झाला आहे. रुपये आणि पे या दोन शब्दांचा मिळून RUPAY कार्ड अशी या कार्डच्य़ा नावाची निर्मिती झाली आहे. हे कार्ड राष्ट्रीयच नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात वापरता येतं.  मास्‍टर डेबि‍ट कार्ड,  वीजा कार्डचा वापर देशभरात सर्वात केला जातो. असं असलं तरीही याची सिस्टीम मात्र विदेशी आहे. याआधी रुपे कार्डसाठी वेगळा शुल्क आकारण्यात येत होता. मात्र भारतात ही सुविधा ग्राहकांसाठी आता उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी किमान शुल्क आकारलं जात असलं तरीही याचा वापर जगभरात होतो. इतर कार्डच्या तुलने यावर मिळणाऱ्या सुविधा आणि सेवा अधिक आहेत आणि स्वस्तही आहे. रुपे कार्डवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. हा खर्च सरकार करणार आहे. मोफत मिळणार 10 लाखांपर्यंत इंश्युरन्स (RuPay Select Credit Card) सोबत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत लाइफ इन्शुरन्स देण्यात येणार आहे. SBI आणि PNB, HDFC, ICICIसोबत अॅक्सिस बँकेकडूनही हे कार्ड ग्राहकांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमच्या जवळच्या शाखेत याबाबत चौकशी करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता: https://www.rupay.co.in/sites/all/themes/rupay/document/Insurance-Cover-RuPay-Debit-Cards.pdf हेही वाचा-Paytm, Google Pay करताना ठाण्यातल्या व्यक्तीला हातोहात फसवलं; 1 लाखाचा गंडा हेही वाचा-दररोज 14 रुपये भरा आणि वर्षाला 10.20 लाखांचं पेंन्शन घ्या; मोदी सरकारची योजना
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Pnb

    पुढील बातम्या