Home /News /money /

RuPay कार्डवर 16 हजार रुपये कॅशबॅक मिळवण्याची संधी, यासाठी फक्त करा हे काम

RuPay कार्डवर 16 हजार रुपये कॅशबॅक मिळवण्याची संधी, यासाठी फक्त करा हे काम

रुपे कार्ड (RuPay) आपल्या आंतरराष्ट्रीय कार्डधारकांना निवडक देशांमधल्या व्यवहारावर 40 टक्के कॅशबॅक देणार आहे. NPIC ने गुरुवारी ही माहिती दिली.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : रुपे कार्ड (RuPay) आपल्या आंतरराष्ट्रीय कार्डधारकांना निवडक देशांमधल्या व्यवहारावर 40 टक्के कॅशबॅक देणार आहे. NPIC ने गुरुवारी ही माहिती दिली. या देशांत मिळणार 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक NPIC ने आपल्या पत्रकात म्हटलं आहे की , संयुक्त अरब अमिरात (UAE), सिंगापूर, श्रीलंका, ब्रिटन, अमेरिका, स्पेन, स्वित्झर्लंड आणि थायलंडला जाणाऱ्या भारतीयांनी रुपे इंटरनॅशनल कार्ड (RuPay International Card)अॅक्टिव्हेट केलं तर महिन्याला 16,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या ग्राहकांना मिळणार कॅशबॅक रुपे इंटरनॅशनल कार्ड, जेसीबी, डिस्कव्हर अँड डायनर्स क्लब अशी कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रुपे ट्रॅव्हल टेल्स मोहिमेमध्ये कॅशबॅक मिळेल. (हेही वाचा : तुम्ही भाड्याच्या घरात राहता का? मग असा बदला आधार कार्डवरचा पत्ता) कसं मिळेल कॅशबॅक ? कॅशबॅकचा फायदा घ्यायचा असेल तर ग्राहकांना कमीत कमी 1 हजार रुपयांचा व्यवहार करावा लागेल. एका व्यवहारावर जास्तीत जास्त 4 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ग्राहक एका महिन्यात 4 वेळा रुपे इंटरनॅशनल कार्ड वापरू शकतात. त्यांना एक महिन्यात 16 हजार रुपये कॅशबॅक मिळवण्याची संधी असेल. वेगवेगळ्या मोबाइल अॅप्स वर आपल्याला कॅशबॅक मिळवण्.ाची संधी असते. पण रुपे कार्डने तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कॅशबॅक देण्याची ऑफर दिली आहे. ही योजना जास्त फायदेशीर आहे. (हेही वाचा : Gold Price Today: नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठे बदल) ======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Cashback, Money

    पुढील बातम्या