मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rules Changing from 1st September: 1 सप्टेंबपासून बदलणार रोजच्या जीवनातील हे 8 महत्त्वाचे नियम, जाणून घ्या अन्यथा खिशाला बसेल फटका

Rules Changing from 1st September: 1 सप्टेंबपासून बदलणार रोजच्या जीवनातील हे 8 महत्त्वाचे नियम, जाणून घ्या अन्यथा खिशाला बसेल फटका

पुढील महिन्यापासून  (Changes from 1 September 2021) काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. यामध्ये अशा आर्थिक बाबींसंदर्भातील नियमांचा समावेश आहे, ज्यांच्या थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.

पुढील महिन्यापासून (Changes from 1 September 2021) काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. यामध्ये अशा आर्थिक बाबींसंदर्भातील नियमांचा समावेश आहे, ज्यांच्या थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.

पुढील महिन्यापासून (Changes from 1 September 2021) काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. यामध्ये अशा आर्थिक बाबींसंदर्भातील नियमांचा समावेश आहे, ज्यांच्या थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: पुढील महिन्यापासून  (Changes from 1 September 2021) काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. यामध्ये अशा आर्थिक बाबींसंदर्भातील नियमांचा समावेश आहे, ज्यांच्या थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल. त्यामुळे या बदलणाऱ्या नियमांचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये EPF पासून चेक क्लिअरिंगच्या नियमांचा समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर

1. PF नियमात होणार बदल

तुमचं आधार कार्ड ईपीएफ खात्याशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे  कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund EPF) सदस्यांना त्यांच्या UAN क्रमांकाशी आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करणं अनिवार्य आहे. दरम्यान आधार कार्ड आणि पीएफ खातं लिंक करण्याची तारीख (Deadline to link Aadhar Card with epf Account) 1 सप्टेंबर आहे. तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते.

2. बदलत आहे चेक क्लिअरिंग सिस्टिम

तुम्ही देखील पैसे पाठवण्यासाठी चेकचा वापर करता का? तर सप्टेंबरपासून 50000 रुपयांपेक्षा जास्तचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचं पालन करावं लागणार आहे.  बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम (positive pay system) लागू होणार आहे. देशातील एक महत्त्वाची बँक असणारी Axis Bank देखील पॉझिटिव्ह पे सिस्टिम पुढील महिन्यापासून लागू करत आहे. बँकेने एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचा-आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवरील बंदी आणखी वाढवली, DGCA कडून नोटिफिकेशन जारी

3. PNB बचत खात्यावरील व्याज घटणार

पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात 1 सप्टेंबरपासून बदल होणार आहे. Punjab National Bank पुढील महिन्यापासून बचत खात्यामध्ये जमा रकमेवर कपात करणार आहे. PNB च्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे. बँकेचे नवीन व्याजदर 2.90 टक्के असणार आहेत, सध्या बँक बचत खात्यावरील रकमेवर 3 टक्के दराने व्याज देते. नवीन व्याजदर सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना (Old and New Customers of PNB) लागू होतील.

4. कार इन्शुरन्सचा नियम बदलणार

एका महत्त्वपूर्ण आदेशात मद्रास हायकोर्टाने  (Madras High Court) असा निर्णय दिला आहे की 1 सप्टेंबरपासून जो कुणी नवीन वाहन विकेल तेव्हा त्यावर बंपर टू बंपर इन्शुरन्स अनिवार्य असेल. हा इन्शुरन्स पाच वर्षांच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर आणि गाडीच्या मालकाला कव्हर करणाऱ्या इन्शुरन्स व्यतिरिक्त असेल. बंपर टू बंपर इन्शुरन्समध्ये गाडीच्या त्या भागासाठी देखील कव्हर मिळेल ज्यावर साधारणपणे इन्शुरन्स कंपन्या कव्हर देत नाहीत.

हे वाचा-करोडपती होण्याची संधी! दररोज अवघे 95 रुपये करा जमा; अशा पद्धतीनं करा गुंतवणूक

5. या ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन महागणार

Disney plus hotstar चे सब्सक्रिप्शन 1 सप्टेंबरपासून महागणार आहे. यानंतर युजर्सना बेस प्लॅनसाठी 399 ऐवजी 499 रुपये द्यावे लागतील. याशिवाय 899 च्या सब्सक्रिप्शनमध्ये ग्राहक दोन फोनमध्ये हॉटस्टार वापरु शकतील, या सब्सक्रिप्शनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल. याशिवाय 1499 रुपयांच्या रिचार्जमध्ये 4 स्क्रीनवर अॅप वापरता येईल

6. गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार

1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडरच्या किंमती बदलू शकतील. महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले जातात. या किंमतीत काही वेळा बदल होतो किंवा काही वेळा दर स्थिर राहतात.

7. Amazon लॉजिस्टिक कॉस्टमध्ये करणार वाढ

डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्याने   Amazon लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून Amazon वरून सामान मागवणं महाग पडू शकतं

हे वाचा-Vishing Fraud द्वारे बँक अकाउंट रिकामं होण्याचा धोका; जाणून घ्या काय आहे प्रकार

8. याप्रकारच्या Apps वर येणार निर्बंध

गुगलची नवी पॉलिसी 1 सप्टेंबर 2021 पासून लागू होत आहे. याअंतर्गत फेक कंटेट प्रमोट करणाऱ्या अॅप्सवर 1 सप्टेंबरपासून निर्बंध आणण्यात येणार आहे. गूगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की अॅप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापासून न वापरण्यात येणाऱ्या अॅप्सना ब्लॉक करण्यात येईल. गूगल प्ले स्टोअरच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर करण्यात आले आहे. गूगल ड्राइव्ह 13 सप्टेंबर रोजी ग्राहकांना नवीन सिक्योरिटी अपडेट मिळेल, त्यामुळे याचा वापर अधिक सुरक्षित होईल

First published:

Tags: Epfo news, LPG Price, Money, Pf