नवी दिल्ली, 31 डिसेंबर: येणारं नवं वर्ष म्हणजेच 2022 हे साल महागाई घेऊन येणार आहे. एक जानेवारी 2022पासून आर्थिक विषयांशी निगडित असलेल्या अनेक गोष्टी बदलणार आहेत. बँकेतून पैसे काढणं (Cash Withdrawal) आणि जमा करणं, एटीएममधून पैसे काढणं, आदी गोष्टी महाग होणार आहेत.
डेबिट आणि क्रेडिट कार्डशी निगडित असलेला एक नियम ग्राहकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. या नव्या नियमानुसार, ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटदरम्यान मर्चंट वेबसाइट किंवा अॅप ग्राहकांचे डिटेल्स स्टोअर करू शकणार नाहीत. तसंच, आधीपासूनच सेव्ह असलेली माहिती डिलीट केली जाईल.
कॅश काढल्यावर चार्ज (Charge for Cash)
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेधारकांना एका मर्यादेच्या बाहेर कॅश काढल्यास किंवा भरल्यास शुल्क द्यावं लागेल. IPPBमध्ये तीन प्रकारची सेव्हिंग अकाउंट्स उघडता येतात. त्यातून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. IPPBच्या बेसिक सेव्हिंग्ज अकाउंटमधून दर महिन्याला चार वेळा कॅश काढणं मोफत आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी कॅश काढताना कमीत कमी 25 रुपये द्यावे लागणार आहेत.
हे वाचा-वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिंका 20000 रुपये! Amazon App देतंय जबरदस्त संधी
एटीएममधून पैसे काढणं महाग
पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना एटीएममधलं मोफत ट्रान्झॅक्शन लिमिट (Free Transaction Limit) संपल्यानंतर जास्त शुल्क मोजावं लागणार आहे. एक जानेवारी 2022पासून शुल्कवाढ करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने या शुल्कवाढीला परवानगी दिली होती. बँकेच्या एटीएममधून मोफत ट्रान्झॅक्शन लिमिट संपल्यानंतर 21 रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे.
ऑनलाइन फूड ऑर्डरिंगवर जीएसटी
स्विगी, झोमॅटो यांसारखे ई-कॉमर्स स्टार्टअप (Online Food Ordering) एक जानेवारी 2022पासून आपल्या सेवेवर जीएसटी आकारतील. आता त्यांना अशा सेवेसाठी सरकारकडे चलन जमा करावी लागतील. ग्राहकांवर याचा फारसा बोजा पडणार नाही. सध्या हाच टॅक्स रेस्टॉरंटकडून घेतला जातो, पुढील महिन्यापासून अॅग्रीगेटरला हा टॅक्स द्यावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे नाही मोजावे लागणार. सरकारने आता हे पाऊल उचलण्यामागचं कारण म्हणजे त्यामुळे करसंकलन वाढेल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे करचुकवेगिरीलाही आळा घालण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे.
हे वाचा-ISGEC ठरला 2021मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेअर; 1लाख रुपयाचे बनवले 4 कोटी
ट्रान्सपोर्ट सर्व्हिस
ई-कॉमर्स स्टार्टअपद्वारे दिल्या जाणाऱ्या ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसवरही पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. ऑटोरिक्षा ड्रायव्हर ऑफलाइन मोडवर सर्व्हिस देत असेल, तर जीएसटी लागणार नाही.
ऑनलाइन पेमेंट पद्धत
एक जानेवारीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आहे. ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांमध्ये बदल केला आहे. आता ऑनलाइन पेमेंट करताना ग्राहकांना 16 डिजिटच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबरसह कार्डचे सगळे डिटेल्स भरावे लागणार आहेत. कारण आता हे डिटेल्स मर्चंट वेबसाइट्स किंवा अॅप्स त्यांच्याकडे स्टोअर करून ठेवू शकणार नाहीत. तसंच आधीपासून सेव्ह असलेली माहिती डिलीट केली जाईल.
गुगल प्ले स्टोअरवरही पेमेंट करण्याचे कार्ड डिटेल्स सेव्ह होणार नाहीत. तसंच आधीपासून सेव्ह असलेली माहिती हटवली जाईल. त्यामुळे पेमेंट करताना प्रत्येक वेळी माहिती नव्याने भरावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.