मराठी बातम्या /बातम्या /मनी /Rule Change : 1 एप्रिलपासून बदलणार 'हे' 10 नियम, जाणून न घेतल्यास तुमचं बजेट बिघडणार

Rule Change : 1 एप्रिलपासून बदलणार 'हे' 10 नियम, जाणून न घेतल्यास तुमचं बजेट बिघडणार

एक एप्रिलपासून बदलले नियम

एक एप्रिलपासून बदलले नियम

Rule Change : सध्याचं आर्थिक वर्ष संपायला अगदी तीन दिवस शिल्लक आहेत. येत्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहोत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  Rule Change : एप्रिल महिना सुरु होताच काही नवीन नियम लागू होणार आहोत. यामध्ये शेअर बाजार, गुंतवणूक, आयकरसह तुमच्या खर्चांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे हॉलमार्किंग संबंधित नियम बदलतील. तसंच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीसह अनेक बदल कोणते हे आपण जाणून घेऊया...

  होलमार्किंग नियम

  1 एप्रिलपासून देशभरात फक्त सहा अंकी 'हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक असलेले सोनेच विकले जाईल. म्हणजेच 31 मार्चनंतर सोनार जुने हॉलमार्क असलेले दागिने विकू शकणार नाही.

  विमा पॉलिसीवर लागणार कर

  2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार विम्याचा वार्षिक प्रीमियम 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकरण्यात येईल. आतापर्यंत विम्याचे नियमित उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त असायचे. मात्र 1 एप्रिलपासून हा नियम बदलेल.

  एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या किंमतींमध्ये होतील बदल

  दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या तेलाच्या किंमतींमध्ये बदल करतात. यामुळे यावेळी तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतात.

  डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी आवश्यक

  डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी ठेवणं आवश्यक असणार आहे. या नामांकनाची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. तुम्ही नॉमिनी न ठेवल्यास 1 एप्रिलपासून ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट गोठावलं जाईल.

  एप्रिल 2023 मधील बँकांच्या सुट्ट्या

  एप्रिल महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. महिन्याची सुरुवातच सुट्टीने होतेय. सात विकेंडच्या सुट्ट्या आणि आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईद अशा सुट्ट्यांमुळे बँक 15 दिवस बंद असेल.

  एक लीटर इंधनात किती किलोमीटर चालतं विमान? उत्तर पाहून तुम्हीही व्हाल चकीत

  सोन्याच्या रुपांतरावर कोणते ही भांडवली कर लागणार नाही

  2023 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलं की, 1 एप्रिलपासून तुम्ही भौतिक सोन्याचं ई-गोल्डमध्ये रुपांतर केलं किंवा ई-गोल्डचं भौतिक सोन्यात रुपांतर केलं तर त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही.

  आधार-पॅन लिंक आवश्यक

  तुम्ही तुमचं आधार-पॅन लिंक केलं नसेल तर 31 मार्चपूर्वी करा. असं न केल्यास 1 एप्रिलपासून पॅन निष्क्रिय होईल.

  हे फुलांच नाही तर पैशांच झाड! कमी वेळेत मिळवता येईल बक्कळ पैसा

  होंडा, टाटा, मारुतीच्या गाड्या होणार महाग

  1 एप्रिलनंतर वाहन खरेदी करण्याचं प्लानिंग करत तर तुमच्या खिशावर ताण पडणार आहे. कारण Honda, Maruti Suzuki, Tata Motors, Hero Motocorp सारख्या कंपन्यांनी 1 एप्रिलपासून वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहेत.

  दिव्यांगजनांसाठी UDID असेल अनिवार्य

  17 सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना 1 एप्रिलपासून केंद्राकडून जारी केलेले युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक अनिवार्यपणे द्यावा लागेल. सरकारने म्हटले आहे की ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाही त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडी नोंदणी क्रमांक (केवळ यूडीआयडी पोर्टलवरून तयार केलेला) द्यावा लागेल.

  दिव्यांगांसाठी UDID अनिवार्य

  17 सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना 1 एप्रिलपासून केंद्राने जारी केलेला युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक देणे अनिवार्य असेल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे यूडीआय कार्ड नसेल त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडी नोंदणीक्रमांक

  NSE वरील ट्रांझेक्शन फिसमधील 6% वाढ मागे

  नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने रोख इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील ट्रांझेक्शन फिसमध्ये 1 जानेवारी 2021 पासून सहा टक्के वाढ केली होती. आता 1 एप्रिलपासून ही वाढ मागे घेण्यता आली आहे.

  First published:
  top videos