
आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. आजपासून काही नियम बदलणार आहेत ज्याचा थेट तुमच्या खिशावर किंवा आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. जर हे बदल तुम्ही आताच जाणून घेतले नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं.

आजपासून लॉकरचे नियम बदलले आहेत.

विमा योजनेसाठी KYC अनिवार्य असणार आहे. जर KYC केलं नाही तर मोठ्या समस्या निर्माण होऊ शकते. पॉलिसी देण्याआधी KYC करणं बंधनकारक असणार आहे. लाइफ, मेडिकल, वाहन, घर आणि ट्रॅवल इंश्युरन्स या सगळ्यासाठी हे लागू असणार आहे.

आजपासून कारचे दर वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर कार घेणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (पीएफआरडीए) म्हटले आहे की, १ जानेवारी २०२३ पासून एनपीएसमधून स्वयंघोषणापत्राद्वारे ऑनलाइन काही पैसे काढण्याची सुविधा यापुढे सरकारी क्षेत्रातील लोकांसाठी उपलब्ध होणार नाही. जानेवारी 2021 मध्ये, नियामकाने कोव्हिड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर एनपीएस अंतर्गत अंशतः पैसे काढण्याची परवानगी दिली होती.

एसबीआय कार्ड्सने आपल्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटमध्ये बदल केला आहे. जो 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. त्याचे डिटेल्स आता तुम्हाला ऑनलाइन याची साईटवही माहिती मिळू शकते. एचडीएफसी बँक स्मार्टबॉय ऑनलाइन पोर्टलवर, उड्डाण आणि हॉटेल बुकिंगसाठी महिन्यात रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम केले जातील.

याशिवाय CNG आणि PNG चे दर दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येतात. त्याचाही थेट परिणाम होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.