ऑफिसमधली उद्धट वागणूक असते संसर्गजन्य? काय सांगतोय हा रिसर्च?

ऑफिसमध्ये छोट्या छोट्या गोष्टींत अपमान करतात. याचा परिणाम वातावरणावर होत असतो.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 01:05 PM IST

ऑफिसमधली उद्धट वागणूक असते संसर्गजन्य? काय सांगतोय हा रिसर्च?

मुंबई, 18 मे : अनेकदा आपण ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण अनुभवत असतो. अनेक जण तुमच्याशी उद्धट वागतात. छोट्या छोट्या गोष्टींत अपमान करतात. याचा परिणाम वातावरणावर होत असतो. एका संशोधनात असं आढळून आलंय की, आक्रमकपणा, हिंसा ही धोकादायक असतेच. पण वागण्यातून कोरडेपणा दिसला, रुडनेस जाणवला तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांची सृजनशीलता, कार्यतत्परता आणि मदत करण्याची वृत्ती यावर होतो.

तुम्हाला हे माहीत आहे का की उद्धट वागणं हे संसर्गजन्य आहे. म्हणजे एखाद्यानं दुसऱ्याशी रागानं वागणं हे त्याला दुखवून तर जातंच, पण ती व्यक्तीही वैतागलेली असते. मग तिसऱ्या माणसाशी वागताना ती तशीच वागत असते.

3 ते 4 लाखांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

ऑफिसातला उद्धटपणा हा संसर्गजन्य आहे 

फ्लोरिडाच्या युनिव्हर्सिटीनं एक सर्वे केला. त्यात एका व्यक्तीशी मुद्दाम उद्धट वागलं गेलं. तर ती व्यक्ती इतर अनेकांशी तसंच वागते, हे आढळून आलंय. हा सात आठवड्याचा कोर्स होता. यात हेही जाणवलं एखाद्याला तुम्ही अपमानीत केलं, तर पुढचे सात दिवस ही गोष्ट त्या व्यक्तीच्या मनातून जात नाही.

Loading...

धोनीच्या खेळाबद्दल हरभजनने दिला संघ व्यवस्थापनाला सल्ला

उद्धटपणा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे का पसरतो?

एका संशोधनातून हे सिद्ध झालंय की भावना आणि वागणूक हे संसर्गजन्य असतात. तुमच्या आजूबाजूचे लोक आनंदी असले, तर तुम्हालाही छान वाटायला लागतं. उलट आजूबाजूचे लोक चिडखोर असले तर तुमचं मनही तसंच व्हायला लागतं.

पुणेकरांनो सावधान! रेल्वे घातपाताचा शिजतोय कट

तज्ज्ञांच्या मते तुम्ही तुमच्या सहकाऱ्याशी संवाद साधता तेव्हा तुमच्या नकळतही तुमच्या मेंदूवर परिणाम होत असतो. आणि तो वागण्यातून समोर येतो.

ऑफिसचं काम जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर कामाच्या ठिकाणी एकमेकांशी बोलताना चांगले शब्द वापरणं, उद्धट न बोलणं याची काळजी प्रत्येकानंच घ्यायला हवी. कारण ज्या कर्मचाऱ्याला असा अनुभव येतो, त्याच्या कामावरच फक्त परिणाम होत नाही तर तो ही नकारात्मक भावना दुसऱ्यांबरोबर वागतानाही दाखवून देतो. मग ही साखळी तुटतच नाही. या सर्वेत 98 टक्के लोकांनी सांगितलंय की त्यांना आॅफिसमध्ये नेहमीच उद्धट वागणुकीचा अनुभव येतो.


बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...