मुंबई, 12 जुलै : भारतीय रेल्वे तिकीट बुकिंगद्वारे कमाई करतेच. पण तुम्हाला हे माहितीय का, ट्रेन तिकीट रद्द झाल्यावरही रेल्वे कोटींची कमाई करते. RTI मधून ही माहिती समोर आलीय. भारतीय रेल्वेनं आर्थिक वर्ष 2018-19मध्ये तिकिटं रद्द केल्यामुळे भारतीय रेल्वेला 1,536.85 कोटी रुपये कमाई झालीय. मध्य प्रदेशचे आरटीआय कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी शुक्रवारी ही माहिती दिलीय. त्यांना रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सूचना प्रणाली केंद्राकडून वेगवेगळ्या अर्जांवर ही माहिती मिळालीय. रद्द झालेल्या तिकिटांमुळे रेल्वेला 1,518.62 कोटी रुपये मिळालेत.
आरटीआय कार्यकर्त्यानं रेल्वेला विचारलं की रद्द केल्या जाणाऱ्या तिकिटांवर जी रक्कम रेल्वे प्रवाशांकडून घेते, ती कमी करणार का? यावर रेल्वेनं अजून उत्तर दिलेलं नाही. युटीएसद्वारे बुक केलेली तिकिटं रद्द केल्यावर रेल्वेनं 18.23 कोटींची कमाई केलीय.
खूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, 'हे' आहेत नवे दर
ट्रेन तिकीट रद्द करण्याचे नियम
1. चार्ट तयार झाल्यावर 48 तास आधी तिकीट रद्द केलं तर फर्स्ट क्लाससाठी कॅन्सलेशन चार्ज 240 रुपये, सेकंड एसीसाठी 200 रुपये, थर्ड एसी आणि चेअर एसीसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये. सेकंड क्लास सीटिंगसाठी 60 रुपये आहे.
Food Delivery देणाऱ्या Swiggy ने पहिल्यांदाच केली तृतीयपंथीयाची नेमणूक
2. चार्ट तयार करण्यासाठी 12 तास आधी तिकीट रद्द केलं तर 25 टक्के रक्कम किंवा वर दिलेल्या कॅन्सलेशन चार्जेसमध्ये जे जास्त असेल ते कट केलं जाईल. ट्रेन सुटण्याआधी 4 तास तिकीट रद्द केलं तर 50 टक्के कॅन्सलेशन चार्ज लागतो. त्यानंतर तिकीट रद्द केलं तर कुठलाच रिफंड मिळणार नाही. हा चार्ज कन्फर्म आॅनलाइन तिकिटांसाठी आहे.
SBI ग्राहकांसाठी खूशखबर, 1ऑगस्टपासून बँकेच्या 'या' सेवा होतील मोफत
3. तुमच्याकडे वेटिंग आॅनलाइन तिकीट असेल तर ट्रेन सुटण्याआधी अर्धा तास तिकीट रद्द केलं तर 60 रुपये कापले जातील. तिकीट कन्फर्म नसताना रद्द केलं तर पूर्ण रिफंड मिळेल. कन्फर्म तिकिटावर कॅन्सलेशनचा चार्ज कापला जाईल.
4. चार्ट तयार झाल्यावर तिकीट रद्द झालं तर वेगळे नियम आहेत. ई तिकीट चार्ट तयार झाल्यावर कॅन्सल होत नाही. रिफंडसाठी प्रवाशांना आॅनलाइन TDR फाइल करावा लागेल. नाही तर रिफंड मिळणार नाही.
5. तुम्ही तात्काळ तिकीट घेतलंत आणि कॅन्सल केलंत तर रिफंड मिळत नाही. ट्रेन तीन तास उशिरा धावत असेल तर रिफंड मिळू शकतो.
SPECIAL REPORT : शिर्डीत द्वारकामाईत साईंची प्रतिमा दिसली?