Home /News /money /

घरबसल्या या इसमाने एका कंपनीच्या शेअरमधून कमावले 1500 कोटी, वाचा कसे

घरबसल्या या इसमाने एका कंपनीच्या शेअरमधून कमावले 1500 कोटी, वाचा कसे

सोन्याच्या किंमतीमध्ये रेकॉर्ड स्तरावरील किमतीची नोंद झाल्यानंतर सोमवारी टायटन कंपनी (Titan Share Price) च्या शेअर्सच्या किमतीमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे

  नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: सोन्याच्या किंमतीमध्ये रेकॉर्ड स्तरावरील किमतीची नोंद झाल्यानंतर सोमवारी टायटन कंपनी (Titan Share Price) च्या शेअर्सच्या किमतीमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहेे. कंपनीने 4 रुपये प्रति शेअर डेव्हिडंट (Dividend on Titan Share) देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि काही राज्यांत असणाऱ्या आंशिक लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीत रेकॉर्ड तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी वाढली आहे. मार्चनंतर टायटनच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी भारतातील दिगग्ज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची टायटनच्या स्टॉक्सना पसंती असते. सोमवारी टायटनच्या स्टॉकचा भाव 4.4 टक्क्यांनी वाढून 1089.10 रुपये प्रति शेअर वर पोहोचला होता. मार्च महिन्यात कोरोना काळात हे भाव सर्वात कमी स्तरावर गेले होते. त्यांनतर यामध्ये 50 टक्क्यांचा फायदा आतापर्यंत झाला आहे. 24 मार्च रोजी या स्टॉकचा भाव 720 रुपयांपर्यंत खाली आला होता. यावर्षी टायटनच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र गेल्या 1 महिन्यात 8 टक्क्यांची वाढ देखील झाली आहे.

  वाचा-संकटकाळात हे ATM देईल तुमची साथ! मिळेल फ्री इन्श्युरन्स; वाचा सविस्तर

  मार्चपासून आतापर्यंत 1500 कोटींची कमाई जूनच्या तिमाहीपर्यंत राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4.90 कोटी शेअर्स आहेत, जे 5.53 टक्के होतात. जेव्हा मार्चमध्ये टायटनचे शेअर्स सर्वात कमी स्तरावर होते, तेव्हा या दाम्पत्याने 3,528 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. शुक्रवारी शेजर बाजार बंद होताना ही किंमत 5,112 कोटींवर पोहोचली आहे. याचा अर्थ या दाम्पत्याला 1584 कोटींचा फायदा झाला आहे.

  वाचा-12 लाख लोकांना रोजगाराची संधी, मोबाइल बनवणाऱ्या 22 विदेशी कंपन्याचा प्रस्ताव लॉकडाऊननंतर दागिन्यांची मागणी वाढली जून तिमाहीच्या अपडेटेमध्ये दागिन्यांच्या सेगमेंट (Jewellery segment) मध्ये अंदाजापेक्षा चांगली रिकव्हरी झाली आहे. दागिन्यांमध्ये लोकांची खरेदी वाढल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे. जून तिमाहीच्या अपडेटेमध्ये दागिन्यांच्या सेगमेंट (Jewellery segment) मध्ये अंदाजापेक्षा चांगली रिकव्हरी झाली आहे. दागिन्यांमध्ये लोकांची खरेदी वाढल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे. टायटनचे प्रबंध संचालक सी के वेंकटरम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस आउटब्रेकनंतर एसेट क्लासच्या रुपात सोन्याचे महत्व वाढले आहे. ते पुढे म्हणाले की, लग्नामध्ये होणारा खर्च आणि होलिडे ट्रॅव्हलिंगमध्ये होणारा खर्च कमी होण्याची शक्यता आहे, परिणामी सोन्यामध्ये खर्च वाढू शकतो.

  वाचा-या योजनेत पैसे गुंतवले तर लवकर होतील दुप्पट! वाचा काय आहे यामागचे गणित दरम्यान ब्रोकरेज फर्म मध्ये टायटनच्या स्टॉक संदर्भात जास्त उत्साह नाही आहे.

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Share

  पुढील बातम्या