...म्हणून सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई अचानक केली कमी

...म्हणून सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई अचानक केली कमी

नोटांच्या छपाईचे प्रमाण किती असावे यावर रिझर्व्ह बँक आणि सरकार वेळोवेळी चर्चा करुन निर्णय घेत असतात. याचा निर्णय चलनात असलेल्या प्रमाणावरुन घेतला जातो.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जानेवारी 2019- नोटबंदीनंतर 2 हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. मात्र आता 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाईचे प्रमाण कमी करण्यात आलं आहे, असे नोटांबाबत आर्थिक व्यवहार सचिवांनी स्पष्ट केलं.

आर्थिक व्यवहार सचिव म्हणाले की, गरजेनुसार नोटा छापण्याची योजना आखली जाते. एकूण चलनात असलेल्या नोटांपैकी 35 टक्के नोटा या २ हजारांच्या आहेत. या आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत. सध्यातरी 2 हजारांच्या नोटांची छपाई सुरू ठेवायची की नाही यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.

नोटांच्या छपाईचे प्रमाण किती असावे यावर रिझर्व्ह बँक आणि सरकार वेळोवेळी चर्चा करुन निर्णय घेत असतात. याचा निर्णय चलनात असलेल्या प्रमाणावरुन घेतला जातो. 2 हजारांची नोट चलनात आणली गेली त्याचवेळी नोटांची छपाई हळुहळु कमी करण्याचा निर्णय घेतला होता. नोटबंदीनंतर रोकड लगेच उपलब्ध करण्याच्या उद्देशाने 2 हजारांची नोट चलनात आणली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2 हजारांच्या नोटांची छपाई कमी करण्यात आली आहे. सध्या या नोटांची छपाई सर्वात कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार मार्च, 2017 पर्यंत 328.5 कोटी इतक्या किंमतीच्या 2 हजारांच्या नोटा चलनात होत्या. तर 31 मार्च, 2018 पर्यंत या नोटांची संख्या थोडीशी वाढून त्याची किंमत 336.3 कोटी एवढी झाली.

VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

First published: January 4, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading