नोकरीसाठी आता रोबो घेणार इंटर्व्ह्यू, या बँकेने केली नवी सुरुवात

नोकरीसाठी आता रोबो घेणार इंटर्व्ह्यू, या बँकेने केली नवी सुरुवात

तुम्ही नोकरीसाठी इंटर्व्ह्यू द्यायला गेलात आणि तुमचा इंटर्व्ह्यू रोबोने घेतला तर ? ही कल्पना नाही तर खरंच एका बँकेमध्ये अशा पद्धतीने इंटर्व्ह्यू घेतला जातोय.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेलात आणि तुमचा इंटर्व्ह्यू रोबोने घेतला तर ? ही कल्पना नाही तर खरंच अशा पद्धतीने इंटर्व्ह्यू घेतला जातोय. फेडरल बँकेमध्ये आता कर्मचाऱ्यांची नियुक्ती कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन केली जाणार आहे. नोकरीसाठी उमेदवारांचे इंटर्व्ह्यू घेण्यासाठी FedRecruit नावाच्या या रोबोची मदत घेतली जाणार आहे. आधी हा रोबो नोकरीसाठी आलेल्या इच्छुकांच्या काही चाचण्या घेईल आणि शेवटच्या फेरीत एचआरचे वरिष्ठ अधिकारी त्या उमेदवाराला भेटतील.

अशी असेल इंटर्व्ह्यूची प्रक्रिया

FedRecruit हा रोबो काही मुद्द्यांच्या आधारे उमेदवाराची चाचणी घेईल आणि त्याचं 360 डिग्री परीक्षण करेल. यात रोबोटिक इंटर्व्ह्यू, सायकोमेट्रिक आणि गेम बेस्ड परीक्षण असेल. फेडरल बँकेच्या HR प्रमुखांच्या मते, रोबोटिक इंटर्व्ह्यूमुळे त्या उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी मदत होईल. व्हर्च्युअल फेस टू फेस इंटर्व्ह्यूसाठी व्हिडिओ कॅमेरा वापरला जाईल.निवडलेल्या व्यक्तीला चॅटबॉक्सच्या माध्यमातून ऑफर लेटर पाठवलं जाईल.

(हेही वाचा : खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर)

फेडरल बँकेने 350 प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची कँपसमधून नियुक्ती केलीय आणि डिसेंबरपर्यंत उरलेल्या 350 जणांची नियुक्ती होईल. ज्यावेळी पहिल्या 150 जणांची नियुक्ती करण्यात आली तेव्हा या रोबोची चाचणी घेण्यात येत होती.

================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 22, 2019, 5:52 PM IST
Tags: jobmoney

ताज्या बातम्या