Home /News /money /

200 अब्ज डॉलर मार्केट कॅप गाठणारी रिलायन्स पहिली कंपनी, शेअर रेकॉर्ड नवीन उंचीवर

200 अब्ज डॉलर मार्केट कॅप गाठणारी रिलायन्स पहिली कंपनी, शेअर रेकॉर्ड नवीन उंचीवर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने गुरुवारी एक नवा रेकॉर्ड रचला आहे. रिलायन्स समुह 200 अब्ज डॉलरची (जवळपास 15 लाख कोटी रुपये) मार्केट कॅप गाठणारी भारतातील पहिली कंपनी बनली आहे

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने गुरुवारी एक नवा रेकॉर्ड रचला आहे. रिलायन्स समुह 200 अब्ज डॉलरची (जवळपास 15 लाख कोटी रुपये) मार्केट कॅप गाठणारी भारतातील पहिली कंपनी बनली आहे. गुरुवारी आरआयएलच्या शेअर्सने रेकॉर्ड रचला आहे. बीएसई (BSE) वर आरआयएलच्या शेअर्समध्ये 8.45 टक्क्यांची तेजी आली आहे. रिलायन्सच्या शेअर्सन 2,343.90 रुपयांचा रेकॉर्ड गाठला आहे. शेअर्समध्ये आलेल्या या तेजीमुळे रिलायन्स समुहाने 200 अब्ज डॉलरची मार्केट कॅप गाठली आहे. रिलायन्स रिटेलचा अमेरिकन कंपनीबरोबर करार अमेरिकन खाजगी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक पार्टनर्स रिलायन्स समुहाच्या (RIL) रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करत आहेत. एसएलपीने या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलमधील 1.75 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. याआधी सिल्ह्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.08 टक्के भागीदारी खरेदी केली होती. (हे वाचा-नोकरी गेल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यामार्फत होईल कमाई, वाचा नियम व अटी) या अमेरिकन कंपनीद्वारे रिलायन्स रिटेलमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर याचा रिलायन्सच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम झाला आहे. रिलायन्स समुहाच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे आणि शेअर्स नवीन रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत. मार्केट कॅप 200 अब्ज डॉलर्सहून जास्त गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8.45 टक्क्यांची तेजी आली आहे. परिणामी रिलायन्सच्या शेअर्सनी 2,343.90 रुपयांचा रेकॉर्ड स्तर गाठला आहे. शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे मार्केट कॅप वाढून 14,84,634 कोटी अर्थात 200 अब्ज डॉलर झाले आहे. सर्वात मोठी आयटी फर्म असणाऱ्या टीसीएसचे (TCS) मुल्य 119 अब्ज डॉलर आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance

    पुढील बातम्या