Home /News /money /

RIL Q3 Results: रिलायन्सचा नेट प्रॉफिट 41 टक्क्यांनी वाढून 18 हजार 549 कोटींवर

RIL Q3 Results: रिलायन्सचा नेट प्रॉफिट 41 टक्क्यांनी वाढून 18 हजार 549 कोटींवर

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 41 टक्क्यांनी वाढून 18,549 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 13,101 कोटी रुपये होता.

    मुंबई, 21 जानेवारी : रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance industries Q3 results) आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 41 टक्क्यांनी वाढून 18,549 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Reliance Net Profit) 13,101 कोटी रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे उत्पन्न वाढून 1,91,271 कोटी रुपये झाले आहे जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1,23,997 कोटी रुपये होते. ब्लूमबर्गच्या सरासरी अंदाजानुसार, रिलायन्सचा निव्वळ नफा 15,264 कोटी रुपये आणि उत्पन्न 1.75 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता. Multibagger Share : 'या' शेअर्समुळे नव्या वर्षात गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस; 210 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालापूर्वी NSE वर रिलायन्सचे शेअर्स 2476 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 18.26 टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल जाहीर केल्यानंतर, चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी म्हटलं की, रिलायन्सने आर्थिक वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. आमचे दोन्ही कन्जुमर बिझनेस रिटेल आणि डिजिटल सर्व्हिसचे महसूल आणि EBITDA उच्चांकावर आहे. आम्ही पुढेही स्ट्रॅटेजिक इनवेस्टमेंट आणि पार्टनरशिपवर लक्ष केंद्रित करू जेणेकरुन भविष्यातही ही वाढ कायम राहील. Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' सरकारी कंपनीतील हिस्सेदारी कमी केली, तुमच्याकडे आहे का? रिलायन्स जिओचे निकाल? चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा (Reliance Jio Infocomm) निव्वळ नफा 3,615 कोटी रुपये आहे, जो मागील तिमाहीपेक्षा सुमारे 2.5 टक्के अधिक आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स जिओचा महसूल देखील तिमाही आधारावर 3.3 टक्क्यांनी वाढून 19,347 कोटी रुपये झाला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Reliance, Reliance Jio, Share market

    पुढील बातम्या