RIL चं बाजार भांडवल 10 लाख कोटींवर; हा मान मिळवणारी देशातली पहिलीच कंपनी

RIL चं बाजार भांडवल 10 लाख कोटींवर; हा मान मिळवणारी देशातली पहिलीच कंपनी

बाजार भांडवलाच्या दृष्टीने देशातली नंबर वन कंपनी होण्याचा मान रिलायन्स इंडिस्ट्रीज लिमिटेड RIL ला मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : बाजार भांडवलाच्या दृष्टीने देशातली नंबर वन कंपनी होण्याचा मान रिलायन्स इंडिस्ट्रीज लिमिटेड RIL ला मिळाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी 10 लाख कोटींपर्यंत बाजारमूल्य गेलेली पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे. आजच्या घडीला सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली देशातली कंपनी रिलायन्स हीच आहे. RIL चे स्टॉक एक टक्क्याने वाढले. गुरुवारी दिवसभरा ही वाढ झाल्यानंतर त्यांच्या शेअरमूल्याने 1581.25 रुपये एवढी उंची गाठली. हा एक प्रकारचा विक्रमी आकडाच आहे.

या वाढीमुळे कंपनीने त्यांच्या एकूण बाजार भांडवलचा 10 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. 10 लाख कोटींहून अधिक market cap म्हणजेच बाजार भांडवल असलेली ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

गुरुवारी (दि. 28 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 12 मिनिटांनी रिलायन्स इंडस्ट्रीजने 1579.00 रुपयांचा आकडा शेअर बाजारात गाठला. रिलायन्सच्या शेअर्सचं मूल्य 9.25 रुपयांनी वाढलं. BSE मध्ये 0.59 टक्क्यांची ही वाढ होती. त्यामुळेच RIL ला नवी उंची गाठता आली.

सरकारी कंपनी इंडियन आॅइल काॅर्पोरेशन ( IOC )ला मागे टाकत RIL देशातली सर्वात जास्त भांडवल असणारी कंपनी झालीय. पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकाॅमसारख्या विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या RIL नं आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर IOC नं31 मार्च 2019ला संपलेल्या आर्थिक वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

2018-19मध्ये रिलायन्सचा नफा 39,588 कोटी रुपये होता. इंडियन आॅइलनं या संपलेल्या आर्थिक वर्षाचा नफा 17,274 कोटी रुपये नोंदवलाय.

जगातल्या सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) यादीत सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, इंडियन ऑइल काॅर्पोरेशन ( IOC )चे अध्यक्ष संजीव सिंह आणि ओएनजीसी (ONGC)चे प्रमुख शशी शंकर यांचा समावेश आहे. सीईओ वर्ल्ड पुस्तिकेनं 2019मधल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली CEO ची यादी दिलीय. यात 10 भारतीय CEO आहेत.

--------------------------------------

अन्य बातम्या

1 एप्रिलपासून बदलणार वीजपुरवठ्याचा हा नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कमी होणार पगार! खाजगी नोकरदारकांना मोठा फटका

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, या छोट्याशा चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 12:27 PM IST

ताज्या बातम्या