Home /News /money /

रिलायन्स समुहाची आज 43वी AGM; 5G,जिओ प्लॅटफॉर्म लिस्टिंगबाबतच्या घोषणांकडे लक्ष

रिलायन्स समुहाची आज 43वी AGM; 5G,जिओ प्लॅटफॉर्म लिस्टिंगबाबतच्या घोषणांकडे लक्ष

मार्केट कॅपच्या हिशोबाने देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स समुहाचा (Reliance Industries Ltd.) एजीएममध्ये कंपनीच्या मेगा फ्यूचरसंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा करण्यात येणार आहेत.

    नवी दिल्ली, 15 जुलै : मार्केट कॅपच्या हिशोबाने देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स समुहाच्या (Reliance Industries Ltd.) एजीएममध्ये कंपनीच्या मेगा फ्यूचरसंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. CNBC आवाजच्या मते यामध्ये  Reliance Jio डील आणि समुह ठरलेल्या कालावधीआधी कर्जमुक्त झाल्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industry Chairman Mukesh Ambani) फेसबुकसारख्या टेक दिग्गजांबरोबर करण्यात आलेल्या भागीदारीचा फायदा घेण्यासंदर्भात मोठ्या घोषणा करू शकतात. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, एजीएममध्ये मुकेश अंबानी शेअरधारकांसमोर रिलायन्स समुहामध्ये तेलाला रसायनामध्ये बदलण्याच्या मोठ्या योजनेबद्दलही माहिती देतील. रिटेल बिझनेसचा ग्रोथ प्लॅन या बैठकीमध्ये रिलायन्स समुहाच्या रिटेल बिझनेस ग्रोथ संदर्भात सविस्तर चर्चा केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे O-to-C बिझनेस प्लॅनबाबत माहिती देण्यात येईल. जाणकारांच्या मते या बैठकीमध्ये कंपनी Aramco करारासंदर्भात माहिती देऊ शकतात. मॉर्गन स्टेनली यांच्या मते आजच्या एजीएममध्ये O-to-C बिझनेसमधील भागीदारी विक्रीच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात येईल. (हे वाचा-रेकॉर्ड स्तरावर पोहोचले रिलायन्सचे शेअर, आज होणाऱ्या AGMमध्ये होऊ शकतील या घोषणा) त्याचप्रमाणे डिजिटल व्यवहारांमध्ये भागीदारीसाठी आखण्यात येणारी रणनीती, याबाबत आणखी माहिती मिळू शकते. तसंच आर्थिक व्यवहारांच्या वाढीबाबतही अधिक माहिती देण्यात येईल. आजच्या एजीएममध्ये व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट्स बनवण्यासाठी ऊर्जाकण कार्बनमुक्त करण्यासाठी कंपनीच्या योजनेबाबत माहिती देण्यात येईल. जिओ प्लॅटफॉर्मची लिस्टिंग, 5G संदर्भात होऊ शकतात मोठ्या घोषणा जिओला जगभरातील गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या कमालीच्या प्रतिसादानंतर आता जिओ प्लॅटफॉर्मच्या लिस्टिंगबाबत घोषणा होऊ शकते. कंपनी गुंतवणूक वाढवण्यासाठी इंटरनॅशनल मार्केटमध्ये लिस्टिंग करणार असल्याचे संकेत याआधीही कंपनीने दिले आहेत. त्याचप्रमाणे जिओ फायबर आणि 5G शी संबंधितही काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. इंडिट्रेड कॅपिटलचे सुदीप बंडोपाध्याय यांनी बिझनेस स्टँडर्डला अशी माहिती दिली आहे की, कंपनी यासंदर्भात माहिती देईल की, जिओ प्लॅटफॉर्म संदर्भात समुहाच्या नेमक्या योजना काय आहेत. ते म्हणाले की, 'लिस्टिंगच्या टाइमलाइनबरोबर हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की याची लिस्टिंग भारतीय स्टॉक एक्सचेंजवर होईल की इंटरनॅशनल मार्केटमध्ये होईल'.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance Jio

    पुढील बातम्या