कमाल! अवघ्या 8 वर्षांच्या मुलाने कमवले 182 कोटी रुपये! जगात ठरला अव्वल

कमाल! अवघ्या 8 वर्षांच्या मुलाने कमवले 182 कोटी रुपये! जगात ठरला अव्वल

फोर्ब्ज मासिकाने यूट्यूबवर जोरदार कमाई करणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रेयान काजी नावाचा 8 वर्षांचा मुलगा टॉपवर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : फोर्ब्ज मासिकाने यूट्यूबवर जोरदार कमाई करणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रेयान काजी नावाचा 8 वर्षांचा मुलगा टॉपवर आहे. 2019 मध्ये रेयानने 182 कोटी रुपये कमवले आहेत. त्यामुळेच तो जगात अव्वल स्थानावर आहे. रेयानच्या यू ट्यूब चॅनलचे 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. रेयान खेळण्यांचे व्हिडिओ बनवतो. त्याचे आईबाबा त्याचे हे व्हिडिओज यू ट्यूबवर अपलोड करतात.

5 वर्षांची अनासतासिया झाली स्टार

फोर्ब्जच्या रँकिंगमध्ये रेयान काजीच्या चॅनलने डूड परफेक्ट या यू ट्यूब चॅनलला मागे टाकलंय. त्याखालोखाल रशियाची 5 वर्षांची मुलगी अनासतासियाचं चॅनल आहे.रेयान काजीचं खरं नाव रेयान गौन आहे. फोर्ब्जच्या बातमीनुसार, 2018 मध्ये तो व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवणाऱ्यांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर होता.

(हेही वाचा : सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये केले बदल, असे मिळणार 73 लाख रुपये)

अवघ्या तिसऱ्या वर्षी सुरू केलं चॅनल

या मुलाचं चॅनल 'रेयान्स वर्ल्ड' 2015 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याचं वय केवळ 3 वर्षांचं होतं. आता तो 8 वर्षांचा आणि त्याच्या वयाचा सगळ्यात श्रीमंत मुलगा झाला आहे. सोशल मीडियाच्या युगात फेसबुक, यू ट्यूब, टिकटॉकच्या माध्यमातून अनेक जण सेलिब्रेटी झालेत पण याच यू ट्यूबच्या माध्यमातून इतकी संपत्ती मिळवणाऱ्या रेयान काजीचं जगभरात कौतुक होतंय.

====================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 20, 2019, 9:27 PM IST
Tags: forbsmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading