मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EVF vs NPS: म्हातारपणाची काळजी दूर करण्यासाठी कुठं करावी गुंतवणूक?

EVF vs NPS: म्हातारपणाची काळजी दूर करण्यासाठी कुठं करावी गुंतवणूक?

रिटायरमेंटनंतरच्या भविष्याची सर्वांनाच चिंता असते. आपलं भविष्य आर्थिक दृष्टीनं सुरक्षित ठेवण्यासाठी कुठं गुंतवणूक करावी हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

रिटायरमेंटनंतरच्या भविष्याची सर्वांनाच चिंता असते. आपलं भविष्य आर्थिक दृष्टीनं सुरक्षित ठेवण्यासाठी कुठं गुंतवणूक करावी हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

रिटायरमेंटनंतरच्या भविष्याची सर्वांनाच चिंता असते. आपलं भविष्य आर्थिक दृष्टीनं सुरक्षित ठेवण्यासाठी कुठं गुंतवणूक करावी हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 04 फेब्रुवारी : रिटायरमेंटनंतरच्या भविष्याची सर्वांनाच चिंता असते. आपलं भविष्य आर्थिक दृष्टीनं सुरक्षित ठेवण्यासाठी म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, फिक्स डिपॉझिट, रियल इस्टेट, नॅशनल पेन्शन स्किम (NPS)  आणि कर्मचारी भविष्य निधी (EPF)  यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामधील EPF आणि NPS हे सर्वात चांगले पर्याय मानले जातात. या दोन्ही प्रकारात काही फायदे आणि काही तोटे आहेत, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. काय आहेत या प्रकारातील गुंतवणुकीचे वैशिष्ट्य पाहूया

कर्मचारी भविष्य निधी (EPF)

कर्मचारी भविष्य निधीच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या पगारातील किमान 12 टक्के रक्कम ही जमा होत असते. तर संबंधित मालकाच्या द्वारे देखील तितकीच रक्कम EPF मध्ये टाकली जाके. अर्थात कर्मचाऱ्यांना 12 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम गुंतवणुक करण्याचीही परवानगी आहे. ही सर्व रक्कम रिटारमेंट फंडामध्ये जमा होते.

वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर EPF मधील संपूर्ण रक्कम काढता येते. अर्थात मेडिकल खर्च, घर बांधणे, शिक्षण या कामासाठी काही प्रमाणात रक्कम काढण्याची देखील परवानगी आहे. EPF वरील रक्कम करमुक्त असते. EEE प्रकारत याचा समावेश होतो.

(हे वाचा-SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक, इथे तपासा यादी)

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना स्वत: NPS खातं उघडावं लागतं. टियर 1 अकाउंटमधील खात्यामध्ये किमान 500 तर टियर 2 अकाउंटमधील खात्यात किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. NPS खात्यातील गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

एनपीसमधील एक त्रुटी म्हणजे वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम काढल्यावर यामध्ये 40 टक्के अॅन्युटी प्लॅन टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर खातेदार उरलेली 60 टक्के रक्कम वापरु शकतो. त्याचबरोबर हे खातं सुरु झाल्यानंतर 10 वर्षांनी या खात्यामधील एकूण जमा रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत निधी काढण्याची परवानगी असते.

(हे वाचा-LIC ची खास पॉलिसी, दररोज 121 रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख)

इनकम टॅक्स सेक्शन 80 C अंतर्गत एनपीएसवरील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. त्याचबरोबर कर्मचारी सेक्शन 80CCD 2 अंतर्गत देखील कर सवलतीसाठी क्लेम करता येऊ शकतो. मात्र हा क्लेम किमान वेतन आण महागाई भत्त्याच्या 10 टक्के रकमेच्या बरोबर असला पाहिजे.

काय आहे निष्कर्ष?

एनपीएस आणि ईपीएफ या दोन्ही मधील गुंतवणुकीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. या दोन्ही ठिकाणी काही विशिष्ट रक्कम गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विशेषत: रिटायरमेंटनंतरची प्लॅनिंग करणाऱ्या मंडळींनी या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करणं सोयीचं आहे. यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित होईलच शिवाय 2 लाखापर्यंत कर सवलत देखील मिळू शकते. रिटायरमेंटनंतर कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून राहणे हे कमी फायद्याचे आहे. यामुळे या दोन्ही पर्यांयाचा विचार करणे योग्य ठरेल.

First published:

Tags: Investment, Pf, PF Amount, Pf news