मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Retail Inflation: किरकोळ महागाईत मोठी घसरण! सरकारला दिलासा पण सामान्यांना मिळणार का?

Retail Inflation: किरकोळ महागाईत मोठी घसरण! सरकारला दिलासा पण सामान्यांना मिळणार का?

किरकोळ महागाई दराच्या (Retail Inflation) बाबतीत सरकारला दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात महागाई 7 टक्क्यांच्या खाली गेली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.71 टक्के होता. जूनमध्ये तो 7.01 होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांपासून महागाईच दर वाढतच चालला आहे. इंधन दरवाढीसोबत, घरगुती गॅस, तेल अशा अनेक गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आहे. अशा स्थितीत आता मोदी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. किरकोळ महागाई दराच्या (Retail Inflation) बाबतीत सरकारला दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात महागाई 7 टक्क्यांच्या खाली गेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर 6.71 टक्के होता. जूनमध्ये तो 7.01 टक्के इतका वर गेला होता. याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावरही मोठा परिणाम होणार आहे. महागाई दर खाली आला असला तरी आताही तो रिझर्व्ह बँकेच्या निश्चित आकड्यापेक्षा जास्त आहे. जुलै हा सलग सातवा महिना आहे जेव्हा किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या निश्चित आकड्यापेक्षा जास्त राहिला आहे. मे आणि जूननंतर, ऑगस्टच्या बैठकीतही, रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (RBI MPC August 2022 Meet) पॉलिसी रेपो दरात वाढ केली. अशा प्रकारे, गेल्या 4 महिन्यांत रेपो दर 1.40 टक्क्यांनी वाढून 5.40 टक्के झाला आहे. अन्नधान्य महागाईत घसरण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य चलनवाढीचा दर जुलै 2022 मध्ये 6.75 टक्क्यांवर आला आहे, जो मागील महिन्यात 7.75 टक्क्यांवर होता. अन्नधान्याच्या चलनवाढीचा वाटा CPI बास्केटच्या जवळपास निम्मा आहे. CNG आणि PNG च्या किंमती कमी होण्याची शक्यता, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय महागाई दराचे लक्ष्य रिझर्व्ह बँकेने 2022-23 साठी महागाईचा अंदाज 5.7 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सरकारने RBI ला किरकोळ महागाई 2 टक्क्यांच्या फरकाने 4 टक्क्यांवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने किरकोळ महागाई दर 6 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. CPI मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर 7.04 टक्के होता. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्के नोंदवला गेला. CPI आधारित महागाई मे महिन्यात 7.04 टक्के, एप्रिलमध्ये 7.79 टक्के, मार्चमध्ये 6.95 टक्के, फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के आणि जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार का? किरकोळ महागाईचा दर कमी झाला असला तरी रिझर्व्ह बँकेच्या निश्चित आकड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का? हा मोठा प्रश्न आहे. जाणकारांच्या मते किरकोळ महागाईचा दर कमी झाल्याचा सर्वसामान्यांना निश्चित फायदा होईल. मात्र, तो मोठ्या प्रमाणात असणार नाही.
First published:

Tags: Inflation, Modi government

पुढील बातम्या