नवी दिल्ली, 13 जून: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतंच एटीएममधून कॅश (ATM cash withdrawal) काढण्यासाठी काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे. या नियमांसाठी पेमेंट सेवा, बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरकडून दिर्घ काळापासून यासाठी मागणी केली जात होती. यासह ग्राहकांच्या खिशावरही याचा परिणाम होणार आहे.
बँकांच्या एटीएममधून ठरलेल्या फ्री मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यासाठी पुढील वर्षापासून अधिक शुल्क भरावं लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकांना पुढील वर्षापासून ATM द्वारे फ्री मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे. वृत्तसंस्था PTI ने दिलेल्या माहितीनुसार, याअंतर्गत 1 जानेवारी 2022 पासून बँक ग्राहकांनी फ्रीमध्ये पैसे काढण्याच्या किंवा इतर सुविधांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास, त्यांना प्रति ट्रान्झेक्शनसाठी 21 रुपये द्यावे लागतील. जे सध्या 20 रुपये आहे.
बँक ग्राहक फ्री ट्रान्झेक्शन मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा करत असेल, तर 1 जानेवारी 2022 पासून 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति ट्रान्झेक्शन शुल्क भरावं लागेल.
ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा फ्री ट्रान्झेक्शन करू शकतात. ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधूनही पैसे काढण्यास फ्री ट्रान्झेक्शनसाठी पात्र आहे.
याशिवाय RBI ने आणखी एक घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 15 रुपयांवरुन 17 रुपये आणि सर्व केंद्रांवर गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरुन 6 रुपये इंटरचेंज शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. ATM बँकांकडून आपल्या स्वत:च्या ग्राहकांच्या सेवेसाठी तप्तर आहे. परंतु इतर बँकांच्या ग्राहकांना अधिग्रहणकर्ता म्हणूनही सेवा दिली जाते, जिथे ते इंटरचेंज शुल्क घेतात.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.